आसाममधील एनआरसी डेटा गायब

आसाममधील एनआरसी डेटा गायब

नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) आकडेवारी (डेटा) बुधवारी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संकेतस्थळावरून ‘http:/

रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ
त्रिपुरा हिंसाचारः २ पत्रकारांना अटक
नागालँडमध्ये १३ नागरिक सुरक्षा दलाकडून ठार

नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) आकडेवारी (डेटा) बुधवारी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संकेतस्थळावरून ‘http://www.nrcassam.nic.in’, गायब झाल्याने खळबळ माजली. पण ही आकडेवारी तांत्रिक कारणामुळे गायब झाली असून ही आकडेवारी सुरक्षित आहे आणि ती लवकरच प्राप्त होईल असे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आसाममधील एनआरसीची आकडेवारी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. ही आकडेवारी संकेतस्थळावर सुरक्षित राहावी यासाठीचे काम आयटी कंपनी विप्रोकडे देण्यात आले होते. विप्रोचे एनआरसीसोबत असलेले कंत्राट १९ ऑक्टोबरपर्यंत होते पण या कंत्राटाचे नूतनीकरण न झाल्याने ही आकडेवारी ‘क्लाउड’वरून गायब झाली असे एनआरसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही आकडेवारी विप्रोने प्रसिद्ध केल्यास जनतेला ती उपलब्ध होईल पण त्यासाठी दोन-तीन दिवसांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले.

‘http://www.nrcassam.nic.in’ या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट २०१९ रोजी आसाममध्ये झालेल्या एनआरसीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. या आकडेवारीत एनआरसीत सामील झालेल्या नागरिकांची व सामील न झालेल्यांची नावे आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0