‘सीएए’ला विरोधामुळे मोदींचा आसाम दौरा रद्द

‘सीएए’ला विरोधामुळे मोदींचा आसाम दौरा रद्द

नवी दिल्ली : १० जानेवारीपासून गोहाटीत सुरू होणाऱ्या ‘खेलो इंडिया युवक क्रीडा स्पर्धे’चे उद्धाटन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत. आसाममध्ये

रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ
आसाममधील भाजप नेत्यावरही फेसबुकची कृपा
त्रिपुरा हिंसाचारः २ पत्रकारांना अटक

नवी दिल्ली : १० जानेवारीपासून गोहाटीत सुरू होणाऱ्या ‘खेलो इंडिया युवक क्रीडा स्पर्धे’चे उद्धाटन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत. आसाममध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीवरून राजकीय वातावरण तापले असून त्यामुळे मोदींनी या कार्यक्रमाच्या उद्धाटन सोहळ्यास येऊ नये, असा सल्ला राज्यातील भाजपप्रणित आघाडी सरकारने पंतप्रधान कार्यालयाला दिला. त्यानंतर मोदींचा हा दौरा टाळण्यात आला.

आसाममध्ये मोदींचा रद्द केलेला हा दुसरा दौरा आहे. गेल्या डिसेंबरमध्ये गोहाटीमध्ये भारत-जपान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जपानचे पंतप्रधान शिझो अबे उपस्थित राहणार होते. पण नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीच्या मुद्द्यावर आसाममध्ये तणाव निर्माण झाल्याने मोदींनी या परिषदेला येणे टाळले.

आसाममध्ये एनआरसीच्या मुद्द्यावरून अनेक विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी मोदी कोणत्याही कार्यक्रमास आल्यास त्यांना तीव्र विरोध करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे मोदींनी दोन्ही दौरे टाळले.

५ जानेवारी रोजी गोहाटीमध्ये भारत-श्रीलंका क्रिकेट सामना झाला होता. या सामन्याला मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल उपस्थित होते. या सामन्यादरम्यान उपस्थित प्रेक्षकांनी सोनावाल यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या व त्यांना स्टेडियम सोडून सांगण्यास सांगितले. प्रेक्षकांनी राज्याचे अर्थमंत्री हेमंता बिस्वा यांच्याविरोधातही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. या दोघांची प्रतिमा स्टेडियमवरील पडद्यावर दिसताच प्रेक्षक त्यांची हुर्यो उडवत होते. हा वाढता विरोध पाहून राज्य सरकारने मोदींचा आसाम दौरा रद्द करण्याचा अहवाल केंद्राला पाठवला असे वृत्त ‘नियोमिया बर्ता’ या आसामी वर्तमानपत्राने दिले आहे.

नलबारीमध्ये २० डिसेंबरला आसूच्या समर्थकांनी निदर्शने केली.

नलबारीमध्ये २० डिसेंबरला आसूच्या समर्थकांनी निदर्शने केली.

खेलो इंडिया ही केंद्रपुरस्कृत क्रीडास्पर्धा असून २०१८मध्ये नवी दिल्ली व नंतर महाराष्ट्रात ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्हींचे उद्घाटन मोदींनी केले होते. मोदींनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेलो इंडिया नावाच्या ऍपचे उद्घाटन केले होते. या ऍपच्या माध्यमातून देशातील तरुण खेळाडूंचा शोध अपेक्षित आहे. त्यामुळे खेलो इंडिया स्पर्धेच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी उपस्थित असणे हे गृहित धरण्यात आलेले आहे.

खेलो इंडियाचे सीईओ अविनाश जोशी यांनी न्यू इंडिया एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान दौऱ्यांबाबत आपल्याला अद्याप माहिती दिली नसल्याचे सांगितले. ही स्पर्धा १० जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान होणार आहे.

‘आसू’चे तीव्र आंदोलनाचे इशारे

७ जानेवारीला ऑल आसाम स्टुडंट युनियनचे (आसू) सल्लागार समूज्जल भट्‌टाचार्य यांनी एका पत्रकार परिषदेत खेलो इंडिया आसाममध्ये होत असल्याचे स्वागत केले पण या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार असतील तर आम्ही त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करू असा इशारा दिला होता.

भट्‌टाचार्य व आसूच्या काही वरिष्ठ नेत्यांची मोदींना विरोध हीच भूमिका आहे. त्यांनी १० जानेवारी रोजी मोदी आल्यास आंदोलनाची तयारीही केली आहे.

या संदर्भात ‘द वायर’ने आसूचे सरचिटणीस ल्युरिज्युतो गोगोई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोदी सरकार सामान्य लोकांच्या आवाजाला घाबरत असल्याची टीका केली.

‘आसू’सारखीच भूमिका आसाम जातीयोताबादी युवा छत्र परिषदने (एजेवायसीपी) जाहीर केली आहे. या संघटनेने ५ जानेवारी रोजी गोहाटीमध्ये मोठी सभा घेऊन मोदी गोहाटीत येत असतील तर त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने केली जातील असा इशारा दिला आहे. ‘ते लोक ‘खेलो मोदी’ म्हणत असतील तर आसामचे लोक ‘भगाओ मोदी’ म्हणत आपला संताप रस्त्यावर व्यक्त करतील, असे एजेवायसीपीचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0