देशात कोरोनाचे २८ रुग्ण, २८ हजारांवर देखरेख

देशात कोरोनाचे २८ रुग्ण, २८ हजारांवर देखरेख

नवी दिल्ली : जगभर फैलावत चाललेल्या कोरोना विषाणूची देशात २८ जणांना लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली. त्यामुळे भ

राज्यात विमानतळावर आणखी कडक निर्बंध
कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना
राज्यात येत्या सोमवारपासून शाळा सुरू

नवी दिल्ली : जगभर फैलावत चाललेल्या कोरोना विषाणूची देशात २८ जणांना लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली. त्यामुळे भारतात येणाऱ्या सर्व देशांच्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली जाणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. मंगळवारी १२ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले होते पण आता या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे.

बुधवारी आणखी २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर देशात २७ हजाराहून अधिक जणांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. जगभरात कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या ३ हजाराहून अधिक झाली आहे.

ज्या २८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यातला एक रुग्ण दिल्लीचा असून त्याचे सहा नातेवाईक आग्ऱ्यात राहणारे आहेत. एक जण तेलंगणचा, तीन केरळचे नागरिक असून इटालीतून भारतात आलेले १६ पर्यंटकांनाही लागण झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका भारतीय वाहन चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.

देशभरातल्या विमानतळांवर अद्याप ५ लाख ८९ हजार जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून देशाच्या अन्य सीमांतून येणाऱ्या १० लाख जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

काही भारतीय औषधांच्या निर्यातीवर बंदी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सरकारने पॅरॅसिटॅमॉल या गोळीसह अन्य २५ औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारत हा जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा निर्यातदार देश असून तापावर असणारी पॅरॅसिटॅमॉल, प्रतिजैविक मॅट्रोनिडझोल, व्हिटामीन बी-१ व बी-१२ यांच्या निर्यातीवर बंदी आहे.

मोदी होळी खेळणार नाहीत

कोरोना संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाची लागण जगभर पसरत असल्याने कोणताही कार्यक्रम, सोहळा, सण सामूहीकपणे साजरा करू नये, असे आवाहन जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे. त्यामुळे आपण होळी खेळणार नाही, असे मोदींनी ट्विट केले आहे.

सरकारने या संदर्भात  91 1123978046 हा २४ तास चालणारा हेल्पलाईन क्रमांक व ncov2019@gmail.com हा इमेल आयडी जाहीर केला असून कोरोनाचा संशयित दिसल्यास या क्रमांकावर वा इमेलवर संपर्क साधावा असे आवाहन मोदींनी केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0