इंदूरमध्ये डॉक्टरांवर दगडफेक व थुंकणाऱ्या ४ जणांवर रासुका

इंदूरमध्ये डॉक्टरांवर दगडफेक व थुंकणाऱ्या ४ जणांवर रासुका

इंदूर : लॉकडाऊनच्या दरम्यान डॉक्टरांच्या एका पथकावर हल्ला करणाऱ्या चार जणांना इंदूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या चौघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यां

स्वप्नांचा उलटा प्रवास
राज्यात अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण
कोरोना : राज्यातील आकडा ४१

इंदूर : लॉकडाऊनच्या दरम्यान डॉक्टरांच्या एका पथकावर हल्ला करणाऱ्या चार जणांना इंदूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या चौघांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या चार जणांची नावे मोहम्मद मुस्तफा, मोहम्मद गुलरेज, शोएब व मजीब असून या चौघांनी डॉक्टरांवर हल्ला केला. ही घटना एक एप्रिल रोजी इंदूर शहरात टाटपट्टी बाखल भागात घडली.

एक एप्रिलला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेसाठी आरोग्य रक्षकांचे एक पथक टाटपट्टी बाखल या भागात गेले असता या पथकावर जमावाने जोरदार दगडफेक केली.

फेक व्हॉट्सअप व्हिडिओमुळे परिस्थिती चिघळली

या भागात एका ६५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्या वृद्धाच्या कुटुंबियांची माहिती घेण्यासाठी हे आरोग्यपथक त्यांच्या घरी गेले होते. त्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. या दगडफेकीत दोन महिला डॉक्टरांच्या पायावर जबर मार बसला. हे पथक टाटपट्टी बाखल भागातील एका संक्रमित कोरोना रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी आले होते. या दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर त्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या आरोग्य पथकातील एक डॉ. जकिया सैय्यद यांनी सांगितले की, या ठिकाणी चार दिवस आरोग्य पथकाकडून स्क्रिनिंगचे काम सुरू होते. आमच्यावर हल्ले झाले पण आम्ही आमचे काम तर करणारच पण न घाबरता करणार.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार ३० मार्चला शहरातील रानीपुरा भागात एका आरोग्य पथकावर लोकांनी हल्ला करत त्यांना शिवीगाळ केली व त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला.

इंदूरमध्ये २४ मार्च ते २ एप्रिल दरम्यान कोरोना संक्रमणाचा ७५ केसेस नोंद झाल्या आहेत. ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांची घरे छोटी असून शहरातील रानीपुरा, नयापुरा, खजराना, टाटपट्टी बाखल, दौलतगंज व सिलावटपुरा भागात कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत.

अफवांचा बाजार

शहरात टाटपट्टी बाखल व आसपासच्या भागात व्हॉट्सअपवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, या व्हिडिओत तब्येतीने तंदुरुस्त मुसलमानांना पकडून त्यांना कोरोना विषाणूचे इंजेक्शन दिले जात असल्याचे दाखवण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0