दुबईच्या राजकन्येच्या पलायनाचा प्रयत्न भारतामुळे निष्फळ

दुबईच्या राजकन्येच्या पलायनाचा प्रयत्न भारतामुळे निष्फळ

लंडन : दुबईचे राजे व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांची मुलगी शेख लतिफा हिने आखलेल्या पलायन कटाला अयशस्वी करण्यात भारतीय तटरक्षक दलाने महत

भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे
तो माझ्यासाठी तर नाही ना!
महाकाय जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी

लंडन : दुबईचे राजे व पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम यांची मुलगी शेख लतिफा हिने आखलेल्या पलायन कटाला अयशस्वी करण्यात भारतीय तटरक्षक दलाने महत्त्वाची भूमिका बजावली असे ब्रिटनमधील एका न्यायालयाने म्हटले आहे.

शेख लतिफा हिला ४ मार्च २०१८मध्ये भारतीय तटरक्षक दलाने गोव्या नजीक भर समुद्रात एका कारवाईत ताब्यात घेतले व दुबईच्या पंतप्रधानांच्या आदेशानुसार तिला पुन्हा दुबईत पाठवले असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

दुबईचे पंतप्रधान मख्तुम यांची पूर्वीश्रमीची पत्नी व सध्या लंडनमध्ये राजाश्रय घेतलेल्या राजकुमारी हाया बिंत अल-हुसेन यांचा मख्तुम यांच्याशी दोन मुलींच्या ताब्यावरून सध्या ब्रिटनच्या न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणी भारतीय तटरक्षकाची एक कारवाई उघडकीस आली.

हाया हुसेन या जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांची बहिण असून त्यांचा विवाह मख्तुम यांच्याशी झाला होता. पण हाया यांचे एका ब्रिटन अंगरक्षकाशी संबंध असल्याच्या संशयावरून या दोघांमध्ये बिनसल्यानंतर हाया यांनी आपली दोन मुले जलिला व झायेद यांना घेऊन लंडनमध्ये पलायन केले.  त्यानंतर हाया यांनी ब्रिटनच्या न्यायालयात आपल्या मुलांच्या जीवाला मख्तुम यांच्याकडून धोका असल्याचा आरोप केला होता व त्यासंबंधी त्यांनी मख्तुम यांची आणखी एक पत्नी व त्यांच्या दोन मुलींचाही मुद्दा खटल्यात उपस्थित केला होता. या मुलींमध्ये भारतीय तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली मुलगी शेख लतिफा हिचा समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी मख्तुम यांची पहिल्या पत्नीपासून असलेली मुलगी शेख लतिफा हिची सुद्धा आपल्या वडिलांच्या वर्तनाविषयी तक्रार होती आणि तसा एक व्हिडिओ तिने प्रसिद्ध केल्यानंतर जगभर चर्चा झाली होती. २०१८च्या सुरवातीस आपल्या वडिलांच्या तावडीतून सुटण्यासाठी शेख लतिफा हिने आपली एक सहकारी ताइना जुआहियानेन व फ्रान्सच्या एक गुप्तहेर एजंटाच्या मदतीने पलायनाचा कट रचला होता. त्यानुसार हे तिघे जण दुबईतून कतारला एका छोट्या बोटीतून आले व तेथून त्यांनी एक याट घेऊन गोव्याकडे प्रयाण केले. २४ फेब्रुवारी २०१८मध्ये या तिघांनी दुबई सोडली व ४ मार्चला हे तिघे समुद्रामार्फत गोव्याकडे निघाले होते. गोव्या पासून ३० सागरी मैल अंतरावर आले असता या तिघांच्या याटला भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंनी एका ठिकाणी घेरले व त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडून सर्व माहिती मिळवली व त्यानंतर दुबईशी व्यवहार सुरू झाला.

या कारवाईत भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडोंनी हे तिघे जात असलेल्या याटमध्ये स्मोक ग्रेनेडचा वापर व गोळीबार करत प्रवेश केला आणि नंतर या तिघांचे हातपाय बांधले. भारतीय कमांडो लतिफा कोण आहेत, असा वारंवार प्रश्न विचारत होते. त्यांनी ताइना जुआहियानेन यांनाही मारहाण केली. यावेळी लतिफा या भारतीय कमांडोंकडे स्वत:ला मारून टाकावे, दुबईत मला घरी परत जायचे नाही असे वारंवार सांगत होत्या. पण कमांडोंनी त्यांचे काही ऐकले नाही व नंतर शेख लतिफा यांना दुबईच्या राजांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

ब्रिटनच्या न्यायालयाने हा सगळा घटनाक्रम विशद केला पण त्यावर अद्याप भारतीय परराष्ट्रखात्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. भारत व दुबईचे संबंध गेले काही वर्षात अत्यंत दृढ झाले असल्याने अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर भारताने अधिकृत मत व्यक्त केलेले नाही.

दुबईचे राजे मख्तुम यांनी २००० साली त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलींपैकी शम्सा या मुलीचे केंब्रिजमधून अपहरण केले होते व तिला परत दुबईत आणले होते. तर सध्या चर्चेत असलेली दुसरी मुलगी शेख लतिफा हिने यापूर्वी २००२मध्ये ओमानमध्ये पलायन केले होते पण तिचा हा प्रयत्न त्यावेळी अयशस्वी झाला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0