स्टेट बँकेकडून बचत खाते व ठेवींवरील व्याजदरात कपात

स्टेट बँकेकडून बचत खाते व ठेवींवरील व्याजदरात कपात

मुंबई : आर्थिक घोटाळ्यामुळे गोत्यात आलेल्या येस बँकेला वाचवण्याचे प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केले जात असताना स्वत:च्या ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी

नुपूर शर्मा प्रकरण : ‘टाइम्स नाऊ’च्या नाविका कुमारविरोधात एफआयआर
आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे
भारतातील सार्वजनिक चर्चाविश्वाची गळचेपी

मुंबई : आर्थिक घोटाळ्यामुळे गोत्यात आलेल्या येस बँकेला वाचवण्याचे प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केले जात असताना स्वत:च्या ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी एसबीआयने बुधवारी आपल्या सर्व बचत खात्यांसाठी दर महिन्याला आवश्यक असणारी किमान शिल्लक रकमेची अट रद्द केली. या निर्णयामुळे या बँकेच्या देशातील सुमारे ४४ कोटी ५१ लाख खातेदारांना फायदा मिळाला आहे. त्यामुळे खातेदारांच्या खात्यात आता एक पैसाही नसला तरी त्याला त्याबाबत दंड बँकेला द्यावा लागणार नाही.

सध्या एसबीआयच्या बचत खात्यात महानगर, निमशहरी व ग्रामीण भागातील खातेदाराला अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपये शिल्लक ठेवावी लागते. जो ग्राहक एवढी शिल्लक ठेवू शकत नसल्यास त्याला ५ ते १५ रु.पर्यंत दंड बँकेकडून लावला जात असे. आता हा दंड रद्द झाला आहे.

पण दुसरीकडे एसबीआयने बचतीच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात करून तो आता ३ टक्के केला आहे. पूर्वी तो ३.२५ टक्के होता. त्यामुळे १ लाख किंवा त्याहून कमी रक्कम असलेले बचत खाते आता उघडल्यास त्या खातेदाराला ३ टक्के व्याज दर मिळेल.

एसबीआयने अल्पमुदतीच्या व दीर्घ मुदतीच्या ठेवीदारांनाही धक्का दिला. एसबीआयने ७ ते ४५ दिवसांच्या अल्पमुदत ठेवींवरचा व्याजदर ४.५ टक्क्याहून ४ टक्के इतका कमी केला आहे. तर १ वर्षाहून अधिक काळासाठी दीर्घमुदत ठेवींवरील व्याजदर ६ टक्क्यांवरून ५.९० टक्के इतका कमी केला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ७ ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ५.० वरून तो ४.५ टक्के केला आहे तर एक वर्ष व त्याहून अधिक कालावधीच्या दीर्घमुदतीवरील ठेवींवरील व्याजदरात ०.१० टक्के कपात करून तो ६.४ टक्के इतका ठेवला आहे.

कर्जाच्या व्याजदरातही कपात

दरम्यान, एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात ०.१० टक्के ते ०.१५ टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे बँकेचा कर्जदर आता ७.७५ टक्के झाला आहे. महिनाभरात बँकेने दुसऱ्यांदा कर्ज व्याजदर कमी केला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज स्वस्त झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: