नवी दिल्ली : तेलंगण विधानसभेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची साधकबाधक चर्चा होऊन या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करणारा प्रस्तावही मंजूर व्ह
नवी दिल्ली : तेलंगण विधानसभेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची साधकबाधक चर्चा होऊन या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करणारा प्रस्तावही मंजूर व्हावा असे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी विधान केले. राव यांनी त्यांच्याकडे स्वत:चा जन्मदाखलाही नाही अशी कबुलीही दिली.
सीएए व एनआरसीच्या मुद्द्यावर एमआयएमचे नेते अकबुरुद्दीन ओवीसी यांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने राव यांनी हे विधान केले आहे. राज्य सरकारने सीएएच्या संदर्भातील आपले धोरण काय असेल हे पूर्वीच ठरवले आहे. पण ज्या काही विरोधी पक्षांना सीएएवर अधिक विस्तृत चर्चा हवी असेल तर ती विधानसभेत होऊ दे अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षातील अनेक सदस्य आपल्याकडे स्वत:चा जन्मदाखलाही नाही, असे सांगतात, माझ्याकडेही जन्मदाखला नाही, अशी परिस्थिती असताना गरीब वर्गाकडून त्यांच्या जन्माचा दाखला कसा मागता येईल, असा सवालही राव यांनी केला.
पूर्वी गावातल्या पंडिताकडून पत्रिकांवर तारीख टाकून घेतली जात असे, ही तारीख ग्राह्य कशी धरली जाईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझी कुंडली माझ्याकडे आहे पण ती तारीख सरकार ग्राह्य धरू शकत नाही. जर माझाच जन्मदाखला नसेल तर माझ्या वडिलांचा जन्मदाखला मी कुठून आणू असेही ते म्हणाले.
माझा जन्म गर्भश्रीमंत अशा ५८० एकर जमीन असलेल्या घरात झाला पण माझ्याकडे जन्मदाखला नाही तर दलित, अनु. जाती, जमातींकडे, गरीबांकडे कुठून तो येईल. त्यामुळे जन्मदाखला मागण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय ओळखपत्र द्यावे असा सल्ला त्यांनी दिला.
ओवेसी यांनी मांडलेल्या मुद्द्यांशी मी सहमत आहे त्यामुळे सीएएसंदर्भात साधकबाधक चर्चा विधानसभेत व्हावी व या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर व्हावा अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.
मूळ बातमी
COMMENTS