जगात कोरोनाचे रुग्ण ३ लाख, आर्थिक संकटाचे आव्हान

जगात कोरोनाचे रुग्ण ३ लाख, आर्थिक संकटाचे आव्हान

कोरोना विषाणू संसर्गाने जगभरातील सुमारे ३ लाखाहून अधिक जणांना बाधित केले असून रविवारी रात्री उशीरा या साथीने मरण पावलेल्यांची संख्या १२,९४४ झाल्याचे ज

इशारा दुर्लक्षिल्यामुळे अधिकृत अंदाज कोसळले?
इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण
लॉकडाऊन : १५ राज्यांमध्ये केवळ २२ टक्के अन्नधान्याचे वाटप

कोरोना विषाणू संसर्गाने जगभरातील सुमारे ३ लाखाहून अधिक जणांना बाधित केले असून रविवारी रात्री उशीरा या साथीने मरण पावलेल्यांची संख्या १२,९४४ झाल्याचे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने सांगितले आहे. या साथीचे वाढते प्रमाण पाहता जगातील बहुतेकतर देशांनी शट डाऊन करण्यास सुरूवात केली आहे, या मुळे जगापुढे न भूतो न भविष्यती असे आरोग्य संकट व आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रविवारी सकाळपर्यंत अमेरिकेत मृतांचा आकडा ३२३ वर केला. अमेरिकेतील ऑर्लंडो व न्यू यॉर्क येथील जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ वाहतूक सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने घबराट पसरली आहे.

न्यूयॉर्क शहरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १५,१६८ असून मृतांचा आकडा शनिवारी रात्रीपर्यंत ११४ इतका झाला आहे.

संपूर्ण अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण २९,२३५ असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे. अमेरिकेतल्या सर्व ५० राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

इटलीत एकाच दिवशी ६५१ जणांचा मृत्यू

कोरोनाची साथ चीननंतर इटालीमध्ये वेगाने पसरली. रविवार इटलीमध्ये मृतांचा आकडा ६५१ झाला असून आजपर्यंत मृत झालेल्यांचा आकडा  ५,४७६ इतका झाला आहे. पण गेल्या २४ तासात कोरोना साथीच्या रुग्णांत वाढ झाली नसल्याचे एक आशादायक चित्र समोर आले आहे पण तरीही शनिवार ही वाढ १३.५ टक्के असल्याचे प्रशासनाने सांगितले.

इटलीतील आजपर्यंत ४,८२६ आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यातील १८ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येकी १० रुग्णांमध्ये एक रुग्ण हा आरोग्य रक्षक आहे.

स्पेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५९,१३८ इतकी झाली आहे.

रशियाची इटलीला वैद्यकीय मदत

इटलीत गंभीर परिस्थिती पाहता रशियाने १०० डॉक्टर व विषाणूतज्ज्ञांचे पथक इटलीला पाठवले आहे. या पथकासोबत औषधे, वैद्यकीय उपकरणे व अन्य सामान आहे. रशियाची नऊ वाहतूक विमाने शनिवारी इटलीकडे रवाना झाली.

जर्मनीत २ पेक्षा अधिक जणांना जमावबंदी

जर्मनीने संपूर्ण देश बंद करण्यापेक्षा नागरिकांमधील संपर्कावर बंधने आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी जर्मनी प्रशासनाने २ पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहे. हा आदेश कुटुंबातील व्यक्तींना मात्र लागू नाही. पण जर्मनीच्या अध्यक्ष मर्केल यांनी नागरिकांमधील संपर्क टाळण्यावर आपला अधिक भर असल्याचे स्पष्ट केले. दोन व्यक्तींमध्ये किमान १.५ ते २ मीटर अंतर असावे असे आदेशात स्पष्ट केले आहे. जर्मनीत सर्व हॉटेल, हेअर सलून, टॅटू शॉप बंद करण्यात आले आहेत. ही बंदी पुढील २ आठवड्यासाठी आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अॅन्जेला मर्केल यानाही विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये नागरिकांच्या ग्रामीण भागातील प्रवासावर बंदी 

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी ग्रामीण भागात प्रवास करू नये व आपल्या घरातच राहावे असे ब्रिटनच्या सरकारने सांगितले आहे.

ग्रीसमध्ये जीवनावश्यक वाहतूक सोडून सर्वांवर सोमवारपासून बंदी

युरोपमधील कोरोना संसर्गाची भीती पाहता ग्रीसने सोमवारपासून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सोडता अन्य सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना कामावर जाणे अत्यावश्यक आहे असे, सुपरमार्केटमध्ये काम करणारे, हॉस्पिटलमधील कर्मचारी यांना बंदीतून वगळण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0