मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना

मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना

कोरोनाच्या लढाईसाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी राज्यसरकारला सूचना केल्या असून, या लढाईमध्ये शोषितांकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली आहे.

‘हिवरेबाजार पॅटर्न’चे पंतप्रधानांकडून कौतुक
‘आम्ही गरीब माणसं…आम्हाला कोण विचारतं?’
बिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!

मा. श्री. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई

संपूर्ण देश करोना साथीच्या आपत्तीला सामोरा जात असताना देशातील व विशेषत: राज्यातील असुरक्षित व असंघटित समुहांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही महाराष्ट्र शासनाला काही सुचवू इच्छितो.

आमच्या मागण्या

१. कोरोनाची लागण झाली आहे का, हे पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्यापक प्रमाणात जनतेच्या तपासणीची व्यवस्था करावी; विशेषतः सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तींची व्यापक आणि प्राधान्याने तपासणी करावी.

२. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्यादा आर्थिक तरतूद जाहीर करावी. तपासणी, इस्पितळात विशेष खाटा, विलगीकरण कक्ष, व्हेंटीलेटर आणि मास्क सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणावर पुरवाव्यात. खासगी इस्पितळांत कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत उपचार करावेत.

३. जनधन खाती असलेल्यांना आणि बीपीएलमध्ये असलेल्या लाभधारकांना रु. ५,००० त्वरीत हस्तांतरित करावेत. यासाठी केंद्राने राज्यांना पुरेसे आर्थिक साह्य करावे.

४. सर्व शिधापत्रकधारकांना बीपीएल, एपीएल भेद न करता एक महिन्याचे मोफत धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून द्यावे. त्यासाठी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांत असलेला ७.५ कोटी टन साठ्याचा वापर करावा.

केरळ सरकार तसेच उत्तरप्रदेश सरकारने देखील असा निर्णय घेतला आहे.

रेशन दुकांनांवर कांदे बटाटे देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, परंतु ते सवलतीच्या दराने देण्यात यावेत व त्याबरोबर डाळ, साखर देखील उपलब्ध करण्यात यावी.

५. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा विस्तार करून १५० दिवस काम उपलब्ध करावे. या योजनेत मागेल त्याला काम द्यावे.

६. सर्व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा विस्तार करून ती मजबूत करावी.

७. शालेय माध्यान्ह भोजन योजनेतून विद्यार्थ्यांना शिधा घरपोच देण्याची व्यवस्था करावी.

८. या रोगाच्या प्रसारामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला असल्याने त्यांना आर्थिक मदत करावी. येत्या तीन महिन्यात कारखाना वा उद्योग बंद करणार नाही, कामगारांना ले ऑफ देणार नाही, या अटीवर व्यवस्थापनास मदत करावी.

९. ज्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे अशा अनौपचारिक आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी निधीची व्यवस्था करावी.

१०. कोरोना विषाणूमुळे घरी राहावे लागत असलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांना पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळावी.

११. लघु, मध्यम उद्योग आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून कर्जवसुली करण्यास बॅंकांना एक वर्ष मज्जाव करावा.

१२. शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात यावा. व कामगारांच्या वस्तयांनजीक ते उपलब्ध करण्यात यावे.

१३. अंगणवाड्यांमधे पौष्टिक आहार वाढवण्यात यावा व त्यात अंड्यांचा समावेश करण्यात यावा. हे अन्य राज्यात करण्यात आले आहे.

१४. अंगणवाड्यांमधून किशोरवयीन मुली व गर्भार महिलांबरोबर वयस्कर मंडळींना देखील पौष्टिक आहार पुरवण्यात यावा.

१५. करोनाचे निदान करणारी तपासणी केंद्रे वाढवण्यात यावीत.

१६. काॅर्पोरेट क्षेत्राची व ध्रमादाय संस्था, हाॅस्पिटल्स यांची मदत घेऊन तातडीने आरोग्याबाबत काळजी घेणारी यंत्रणा उभारण्यात यावी.

१७. विलगीकरण् कक्षांची संख्या व क्षेत्रवार उपलब्धता वाढवण्यात यावी.

१८. रुग्ण व रुग्णांचे कुटुंब यांचे मानसिक आरोग्य,तसेच आसपासच्या विभागात सामाजिक सद्भाव व सलोखा राखला जावा याची काळजी घेण्याच्या दृष्टीने समुपदेशन केंद्रे उभारण्यात यावीत.

१९. बेघरांसाठी तात्पुरते निवारे उभारण्यात यावेत.

२० वीज व पाणी बिले भरण्याची मुदत वाढवण्यात यावी.

२१. कोणत्याही प्रकारे गरीब वस्त्यांना या वातावरणात हटवण्यात येऊ नये. व विस्थापित केले जाऊ नये.

२२. सफाई कर्मचा-यांना घरातून काम करणे शक्य नाही, त्यांना अधिक काम करावे लागणार आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. तसेच त्यांना गणवेश , मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायजर, साबण, व चपला त्वरित व मोफत देण्यात याव्यात.

तसेच यांतील कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे.

या आजारावर नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आम्ही सर्व संघटना शासनाबरोबर आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत.

आपले नम्र,

डॉ अशोक ढवळे, (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा), मेधा पाटकर ( नर्मदा बचाव आंदोलन व जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय), डॉ .गणेश देवी,(अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल), वाहरू सोनावणे,(आदिवासी एकता परिषद), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), विनोद निकोले, (आमदार, माकप, डहाणू), काळूराम दोधडे (आदिवासी एकता परिषद), मेधा सामंत, (अन्नपूर्णा परिवार), बेबाक कलेक्टिव्ह, पाणी संघर्ष समिती,माण (दहिवडी), संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव जिल्हा, लोकशाही बचाव नागरी कृती समिती, अंमळनेर, इरफान इंजिनिअर,(आॅल इंडिया सेक्युलर फोरम), विश्र्वास उटगी ( कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र), धनाजी गुरव, (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), संविधान प्रेमी नाशिककर, मुमताज शेख(संविधान संवर्धन समिती व महिला मंडळ फेडरेशन), उल्का महाजन (सर्वहारा जन आंदोलन, रायगड), लता भिसे सोनावणे.(राज्य सचिव भारतीय महिला फेडरेशन.), श्रद्धा मेहता (भारतीय महिला फेडरेशन, मुंबई), सुनिती सु. र.(जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय), मकाम महाराष्ट्र, नारी अत्याचार विरोधी मंच, मुबई,  धनंजय रामकृष्ण शिंदे, (आम आदमी पार्टी – महाराष्ट्र), दक्ष फौंडेशन धुळे, अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समिती, सचिन मालेगावकर (शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच नाशिक), सुभाष वारे, (सुराज्य सेना), मुनीर सुलताने,( भटके विमुक्त संसाधन केंद्र सांगली), नारी अत्याचार विरोधी मंच, जगण्याच्या हक्काचं आंदोलन, अन्न अधिकार अभियान, प्राची हातिवलेकर(अखिल भारतीय जनवादी महिला संघटना), कॉम्रेड तुकाराम भस्मे, कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र), कॉम्रेड श्याम काळे (सरचिटणीस आयटक महाराष्ट्र), इब्राहिम खान,( स्वराज अभियान), राजू देसले (संविधान प्रेमी नाशिककर), लाबिया, (queer feminist LBT group), समता आंदोलन, महाराष्ट्र., डॉ.डी.एल.कराड, (भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू), नॅशनल हॉकर्स फेडरेशन, ललित बाबर(स्वराज इंडिया ), मानव कांबळे ( स्वराज अभियान व नागरी हक्क संरक्षण समिती), कथा वसावे(लोक संघर्ष मोर्चा), प्रतिभा शिंदे (संविधान बचाव नागरिक कृती समिती ,जळगाव जिल्हा), अशोक पवार (लोकशाही बचाव नागरी कृती समिती,अमळनेर), फारुख शेख (मुस्लिम मंच, जळगाव जिल्हा), शोषित जन आंदोलन, जुबेर शेख,(संविधान बचाव समिती धुळे), मिलिंद चव्हाण (लोकशाही उत्सव समिती), अॅंड. नाजिमुद्दीन काझी(राहत फाउंडेशन, नाशिक), विलास किरोते, (HBKL), वर्षा विद्या विलास ( सद्भावना संघ), दत्ता सोनावणे (विमानतळ कर्मचारी संघटना), प्रीती शेखर (DYFI, महाराष्ट्र), विराज देवांग( आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन), मारुती खंदारे(महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन {लालबावटा), विजय दिवाण (औरंगाबाद सामाजिक मंच/ हम भारत के लोग), तिस्ता सेटलवाड (हम भारत के लोग), फिरोज मिठीबोरवाला (हम भारत के लोग), आदेश बनसोडे (भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष), निरंजन टकले, जोहाना लोखंडे, मुक्ता श्रीवास्तव, महेश पवार (स्वामिनी संघटना, यवतमाळ), रविंद्र मेंढे(छात्रभारती), राकेश पवार ( छात्रभारती विद्यार्थी संघटना), युवराज बी. (नव्या समाजवादी पर्याय), अभिजित मीनाक्षी(नवजवान भारत सभा), डॉ. रुपा कुलकर्णी(विदर्भ मोलकरीण संघटना), विलास भोंगाडे (कष्टकरी जन आंदोलन, नागपूर), सुरेखा गाडे,(कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत), एकल महिला संघटना, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पाणी हक्क समिती मुंबई, सिताराम शेलार, (सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसी ), गिरीश फोंडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ऑल इंडिया युथ फेडरेशन), प्रशांत आंबी (राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन), माधुरी क्षीरसागर (राज्य सचिव  आंगण वाडी संघटना (आयटक.), कॉ नामदेव गावडे (राज्य अध्यक्ष किसान सभा.), आशाबाई डोके ( कागद कांच पत्रा कामगार संघटना, औरंगाबाद ), डॉ.सुधीर देशमुख / साथी देविदास कीर्तिशाही (   मराठवाडा लेबर युनियन, औरंगाबाद ), कासम भाई / साथी रामचंद्र काळे ( जय किसान आंदोलन – स्वराज अभियान), अमन कमीटी, औरंगाबाद : डॉ. शेख इक्बाल मिन्ने (अमन दूत) अण्णासाहेब खंदारे, प्रशांत गोवंडे, अकोला, कॉम्रेड शिवकुमार गणवीर, (राज्य सरचिटणीस लाल बावटा शेतमजूर संघटना महाराष्ट्र), श्र्वेता दामले ( प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस), NPR/NRC/CAA विरोधी कृती समिती , सातारा, बी. जी. कोळसे पाटील (लोकशासन आंदोलन), डॉ अभिजित वैद्य (अखिल भारतीय आरोग्य सेना), शरद जावडेकर (अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा), उदय चौधरी, शमसुद्दीन तांबोळी, (मुस्लिम सत्यशोधक मंडळ), बालाजी कलेटवाड, रोहिदास जाधव (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया), मनीषा गुप्ते, अजिज पठाण (प्रदेशाध्यक्ष) मुस्लिम आरक्षण संघर्ष समिति., छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, दशरथ जाधव (मानवी हक्क अभियान), अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, संविधान बचाव कृती समिती आष्टी जिल्हा बीड, नागनाथ चव्हाण (वंचित हक्क आंदोलन), संजय खामकर (चर्मकार विकास संघ महाराष्ट्र), अनिल त्यागी (SUCI), कॉ. भैरवनाथ वाकळे, (क्रांतिसिंह कामगार संघटना, अहमदनगर), डॉ. मिलिंद वाघ ( शिक्षण बाज़ारीकरण विरोधी मंच, नाशिक), युनुस सुलतान तांबटकर, ( रहेमत सुलतान फाउंडेशन, अहमदनगर ), अर्शद शेख,(पीस फाऊंडेशन, अहमदनगर), नितीन मते (अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र), ऍड. विष्णू ढोबळे प्रदेशाध्यक्ष, समाजवादी जन परिषद, महाराष्ट्र, ऍड. डी. आर. शेळके ( निवृत्त न्यायाधीश ), कार्याध्यक्ष, सत्यशोधक समाज, महाराष्ट्र, साथी बळवंत मोरे / साथी प्रकाश शिंदे ( शेतकरी शेतमजूर पंचायत, महाराष्ट्र ), शाम गोहिल (भाकप माले लिबरेशन), सुधीर अनवले(भारतीय भटके विमुक्त जमाती विकास संघटना), समीर पटेल (मुस्लिम सेना) उद्धव भवलकर, (कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती औरंगाबाद)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0