कोरोना : ट्रान्सजेंडर समुदाय आणि आरोग्यसेवा

कोरोना : ट्रान्सजेंडर समुदाय आणि आरोग्यसेवा

राज्यात तृतीयपंथीय समुदायातील काहींच्या लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला आहे पण दुसरा टप्पा लॉकडाऊनमुळे रखडला आहे त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही होत आहे.

कोरोना : जनता मृत्यू आणि दारिद्र्याच्या कडेलोटावर
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये संथ वाढ
कोरोनाचा पुनःसंक्रमणाचा धोकाः आयसीएमआर

२१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे देशातील असंघटित आणि अल्पसंख्याक  वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला जात आहे. या अल्पसंख्याक वर्गातील एक घटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय.

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार, काम पूर्णपणे ठप्प झाली आहेत. तृतीयपंथी समुदाय आधीच कुटुंबाची आणि समाजाची सगळी अवहेलना सहन करून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अडचणीचा पाढा काही संपत नाहीये. राज्यात काही ठिकाणी तृतीयपंथीच्या लिंग बदलाच्या, ब्रेस्ट इम्प्लांटच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. अशा प्रकाराच्या शस्त्रक्रिया म्हणजे दुसरा पुनर्जन्मच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

लिंगबदलाची शस्त्रक्रिया म्हणजे रिअसाइन्मेंट सर्जरी म्हणजे लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्या व्यक्तीमध्ये जेंडर डिस्फोरिया म्हणजे स्वत:च्या लिंगाविषयी अस्वस्थतेची भावना असावी लागते. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची मदत घेतली. या व्यक्तीबरोबर पूर्णपणे चर्चा करून मानसोपचारतज्ज्ञ जेंडर डिस्फोरियाविषयी निर्णय घेतात. असं असेल तर उपचारांची सुरुवात ‘हार्मोनल थेरपी’ने केली जाते. यामध्ये योग्य ते हार्मोन्सची औषधं आणि इंजेक्शन दिली जातात.  त्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी केली जाते. यासाठी  व्यक्तीचं वय किमान २० वर्ष किंवा २० वर्षापेक्षा जास्त असावं लागत. २० वर्षांखालील व्यक्तीसाठी त्यांच्या आईवडिलांची परवानगी लागते. शस्त्रक्रियेसाठी किमान एक मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची परवानगी असावी लागते.

या पूर्ण शस्त्रक्रियेसाठी आणि प्रक्रियेसाठी पाच तासापेक्षा अधिक वेळ लागतो.  यात स्तन, जननेंद्रिये आणि चेहऱ्यामध्ये बदल केले जातात. या शस्त्रक्रियेसाठी प्लास्टिक सर्जन, मानसशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, आणि मेंदूविकारतज्ज्ञ यांचा सहभाग आणि टीमने हे काम करावे लागते. शस्त्रक्रियेनंतर एक वर्ष हार्मोनल थेरपी चालू ठेवावी लागते. यानंतर, अशा व्यक्तींचं सामान्य आणि लैंगिक जीवन सुरळीत होतं. या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे १० ते २० लाख खर्च होतो. भारतात लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेला वैद्यकीय विमा मिळत नाही.

सध्या कोरोनामुळे देश लॉकडाऊन आहे. ज्या व्यक्तींची अशी सर्जरी झाली आहे. त्यांना डॉक्टर ड्रेसिंगसाठी परत बोलावतात. कारण सरकारी हॉस्पिटल पेशंटला परत ड्रेसिंगसाठी १० दिवस ठेवत नाही. ही ड्रेसिंग सर्जरीचे जे ड्रेनेज पाईप  असतात त्याला ड्रेनकरून मग ही ड्रेसिंग केले जाते. हे १० दिवस पेशंटने पूर्ण विश्रांती घेणे गरजेचे असते. त्यामुळे पेशंटला घरी पाठवून परत १० दिवसांनी ड्रेसिंगसाठी बोलावतात.

दुसरे हार्मोन्समध्ये दोन बाबी आहेत;  एक जे  तृतीयपंथी पुरुष (ट्रान्समेल) आहे म्हणजे जे आहेत वॅक्सिंग (vaccination) घेतात आणि ज्या तृतीयपंथी स्त्रिया (ट्रान्सवुमन) त्या गोळ्या घेतात.  आताच्या परिस्थितीमुळे त्यांना गोळ्या मिळत नाहीये. मुळातच मार्केटमध्ये या गोळ्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, ट्रान्सपुरूषांना इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टर्स भेटत नाहीये. हे इंजेक्शन घरी घेऊ शकत नाही कारण हे इंजेक्शन शरीराच्या विशिष्ट हाडामध्ये (बोनमध्ये) घ्यावयाचे असते. लॉकडाउनमुळे डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि औषधे नाहीत. त्यामुळे ज्यांच्या शस्त्रक्रियेचा एक टप्पा पार पडला आहे आणि दुसरा टप्पा लॉकडाऊनमुळे रखडला जात आहे त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्य तसेच मानसिक आरोग्यावरही होत आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पेशंट प्रवास करू शकत नाहीये. जे पेशंट स्वत:च्या आरोग्यासाठी प्रवास करण्यास तयार आहेत त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत. ही शस्त्रक्रिया केवळ स्वत:ची ओळख निर्माण होण्यासाठी नाही, तर ही तृतीयपंथी व्यक्तीच्या अस्तित्वाची ओळख आहे.

या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्राच्या मदतीनं सरकारी कागदपत्रात उदाहरणार्थ रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान कार्डवर लिंग बदलून घेऊ शकते. पण, शैक्षणिक कागदपत्रामध्ये हा बदल करता येत नाही.   अपेक्षा आहे राज्य सरकार तृतीयपंथी समुदायाला तात्काळ या अडचणींवर मदत देतील आणि पुढील आरोग्यसेवा मिळावी यासाठी विशेष धोरण आखतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0