अभ्यासक्रमात वैदिक गणिताच्या समावेशाचा प्रस्ताव

अभ्यासक्रमात वैदिक गणिताच्या समावेशाचा प्रस्ताव

मानव संसाधन विभागाने भारतीय पारंपरिक ज्ञान व्यवस्थेतील सिद्धांतांचा आणि वेदांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा अशीही सूचना शिक्षा संस्कृती उत्थान न्यास नावाच्या या संस्थेने केली आहे.

हम घास है…
गणित शिकवणे सोपे आणि इंटरेस्टिंग करूया म्हणता?
माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय

‘द प्रिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार आरएसएसशी संलग्न असलेल्या शिक्षा संस्कृती उत्थान न्यास (SSUN) नावाच्या एक संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील शालेय अभ्यासक्रमात “वैदिक गणिता”चा समावेश केला जावा असा प्रस्ताव दिला आहे.

SSUN यांनी मसुदा NEP साठी मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाला आपले मत आणि सूचना कळवल्या आहेत. द प्रिंट यांच्या बातमीनुसार, ही संस्था “ज्ञान उत्सव २०७६” नावाच्या एका संमेलनामध्ये या सूचनांची चर्चा करेल. या संमेलनाला आरएसएस प्रमुख मोहन भागवत, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे उपस्थित असतील.

SSUNने दिलेल्या इतर सूचनांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय पारंपरिक ज्ञानव्यवस्थेतील सिद्धांतांचा समावेश असला पाहिजे आणि वेदांवर अधिक भर दिला पाहिजे याचाही समावेश असल्याचे द प्रिंट ने म्हटले आहे. स्वामी विवेकानंद, श्रीनिवास रामानुजन, अब्दुल कलाम आणि इतरांचे तत्त्वज्ञान सुद्धा शिकवले गेले पाहिजे असे या आरएसएस संलग्न संस्थेने म्हटले आहे.

या संस्थेचे सचिव अतुल कोठारी, यांनी द प्रिंट ला सांगितले की वैदिक गणिताचा समावेश केल्याने “तरुण विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल आणि त्यांना कॅलक्युलेटरचा वापर करावा लागणार नाही.” स्पर्धा परीक्षांमध्ये कॅलक्युलेटरचा वापर करण्याला परवानगी नसते, त्यामुळे हे खूपच उपयुक्त असेल.

या महिन्याच्या सुरुवातीला, भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) येथील शास्त्रज्ञांनी चांद्रयान-२ या आपल्या दुसऱ्या चांद्रमोहिमेकरिता “वैदिक गणिताचे” तज्ज्ञ असलेल्या पुरी शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांचा सल्ला घेतला होता असा दावा एका पुष्टी न केलेल्या बातमीमध्येकरण्यात आला होता. या लेखाने डीएनए इंडिया मधील एका लेखाचा उल्लेख केला होता ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी चांद्रमोहिमेमध्ये “वैदिक गणनाचा” उपयोग केल्याचा दावा शंकराचार्यांनी केला होता.

जानेवारी २०१९ मध्ये, MHRD ने वैदिक शिक्षणाचे प्रमाणीकरण करण्यासाठी भारतीय शिक्षा बोर्ड (BSB) नावाच्या एका नवीन राष्ट्रीय शिक्षण मंडळाला मान्यता दिली. BSB ला स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः ठरवण्याची, परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची आणि प्रमाणपत्रे देण्याची परवानगी असेल. वैदिक स्कूल बोर्ड स्थापन करण्यामध्ये ज्या तीन अर्जदारांनी स्वारस्य दर्शविले आहे त्यामध्ये बाबा रामदेव हे एक आहेत.

मागच्या काही वर्षांमध्ये, आधुनिक वैचारिक पुस्तकांकरिता प्राचीन भारतीय ग्रंथांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले गेल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे“भारतीय ज्ञान व्यवस्थे”ची सरकार पुरस्कृत चर्चा आणि संशोधन यामुळे देशभर भ्रामक विज्ञानाला आणि भ्रामक वैज्ञानिक दाव्यांना खतपाणी मिळत असल्याबाबतही अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

यापूर्वी, भारतातील सर्वात मोठ्या शिक्षक युनियनचे मुख्य सचिव आणि माजी खासदार शत्रुघ्न प्रसाद सिंग हे असे म्हणाले होते, की शिक्षणाचे केंद्रीकरण रोखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी पंतप्रधानांऐवजी शिक्षणतज्ञांची नेमणूक केली गेली पाहिजे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0