तालिबान-अमेरिका चर्चा फिसकटल्या

तालिबान-अमेरिका चर्चा फिसकटल्या

वॉशिंग्टन/काबुल : अफगाणिस्तानात लोकशाहीची पुनर्स्थापना होऊन तेथे शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने दहशतवादी संघटना तालिबानशी सुरू असलेली चर्चा संप

अफगाणिस्तान आता ‘इस्लामिक एमिरात ऑफ अफगाणिस्तान’
नसिरुद्दीन शहांचे वक्तव्य: कयास आणि विपर्यास
अफगाणिस्तानात भूकंपात हजाराहून अधिक बळी

वॉशिंग्टन/काबुल : अफगाणिस्तानात लोकशाहीची पुनर्स्थापना होऊन तेथे शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने दहशतवादी संघटना तालिबानशी सुरू असलेली चर्चा संपुष्टात आल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये, ट्रम्प यांनी तालिबान दहशतवाद्यांना १० वर्षांत जेवढा धडा शिकवला नाही तेवढा चार दिवसात आपण धडा शिकवला, असा दावा करत या संघटनेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर तालिबानच्या प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी ट्रम्प यांना चर्चा बंद करायची असेल तर आम्हाला युद्धाशिवाय पर्याय नाही असे विधान करून ट्रम्प यांना लवकरच स्वत:च्या निर्णयाचा पश्चाताप होईल असा इशारा दिला.

गेल्या आठवड्यात शनिवारी ट्रम्प यांनी कॅम्प डेव्हिड येथे तालिबान व अफगाणिस्तान यांच्यात होणारी चर्चा आपण रद्द केल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला होता. या बैठकीत १८ वर्षे सुरू असलेल्या अफगाणिस्तान-तालिबान संघर्षाचा मुद्दा चर्चेत येणार होता.

अफगाणिस्तानात अमेरिकेचे १४ हजार सैनिक असून त्यांना मायदेशी बोलवण्याच्या दृष्टीने व अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने अमेरिकेने तालिबानशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. गेले काही दिवस ही चर्चा सुरू होती पण त्यातून अंतिम तोडगा निघत नव्हता. गेल्या आठवड्यात तालिबानने काबुलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात एका अमेरिकी सैनिकासह १२ जण ठार झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने तालिबानच्या तळांवर तुफान बॉम्बवर्षाव केले होते. तालिबानने अमेरिकेच्या सैन्याला लक्ष केल्याने त्यांनी मोठी चूक केली असून आम्ही अफगाणिस्तानातून बाहेर पडणार होतो आता मात्र योग्य वेळ आल्यास बाहेर पडू असे ट्रम्प यांनी उत्तर दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0