उर्मिला मातोंडकर, कृपाशंकरसिंह यांचा काँग्रेसचा राजीनामा

उर्मिला मातोंडकर, कृपाशंकरसिंह यांचा काँग्रेसचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसमध्ये सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी पक्षांतर्गत गटबाजी व राजकारणाला कंटाळून राजीनामा

भाजपला टाटाकडून ३५० कोटींची देणगी
झारखंड: सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
नवं भागवत पुराण

मुंबई : काँग्रेसमध्ये सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी पक्षांतर्गत गटबाजी व राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला. त्याचबरोबर मुंबई काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनीही आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षांकडे पाठवला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्व राजीनामा पत्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील काही नेत्यांनी सहकार्य न केल्याची भावना अधोरेखित केली असून अशा पक्षांतर्गत राजकारणाची मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी दखल घ्यावी म्हणून त्यांनी १६ मे रोजी पत्र पाठवले होते. या पत्राची तत्कालिन अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दखल घेतली नाही पण या पत्रातील गोपनीय माहिती पसरवली गेली. त्याने मातोंडकर नाराज झाल्या होत्या.

या पत्रात उर्मिला मातोंडकर यांचा रोख काँग्रेसचे नेते संजय निरुपम, त्यांचे समर्थक भूषण पाटील, अशोक सूत्राळे व संदेश कोंडविलकर यांच्यावर होता. या पक्षनेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मदत केली नाही अशी मातोंडकर यांची तक्रार होती. आता निवडणुका होऊन १०० दिवस होत असताना गटबाजी करणाऱ्या नेत्यांवर काहीच कारवाई केली जात नाही, त्यांना जाब विचारला जात नाही उलट अशा नेत्यांना चांगली पदे दिली जातात असा मातोंडकर यांचा मुद्दा होता. त्यामुळे राजीनामा देतान मातोंडकर यांनी, मुंबई काँग्रेसमध्ये मला व्यापक उद्दिष्टांसाठी काम करायचं होतं. मात्र, महत्त्वाची पदं सांभाळणाऱ्या नेत्यांनाच पक्षबांधणीत रस उरलेला नाही किंवा त्यांची तशी क्षमता नाही. त्यामुळे भविष्यात पक्षांतर्गत राजकारणासाठी स्वत:चा वापर होऊ द्यायचा नाही, या कारणातून पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्या म्हणाल्या.

उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तिकीट दिले होते. पण त्यांचा भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी प्रचंड मताधिक्यांनी पराभव केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0