दलित कार्यकर्ता हत्येच्या मुद्द्यावरून मेवानींचे निलंबन

दलित कार्यकर्ता हत्येच्या मुद्द्यावरून मेवानींचे निलंबन

अहमदाबादः गुजरात विधानसभा सभापतींच्या परवानगीशिवाय एका दलित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या जमावाकडून झालेल्या हत्येचा प्रश्न सभागृहात उपस्थित केल्यामु

बेकायदा पदच्युती, हेरगिरी आणि आता माहितीपासूनही वंचित
उत्तराखंडः हिमनदी दुर्घटनेत ३ ठार, दीडशेहून अधिक बेपत्ता
तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

अहमदाबादः गुजरात विधानसभा सभापतींच्या परवानगीशिवाय एका दलित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या जमावाकडून झालेल्या हत्येचा प्रश्न सभागृहात उपस्थित केल्यामुळे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचे शुक्रवारी एक दिवसासाठी गुजरात विधानसभेने निलंबन केले. गुरुवारीही त्यांचे अशाच प्रकारामुळे निलंबन करण्यात आले होते.

शुक्रवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर मेवानी यांनी आपल्या हातात एक फलक घेत २ मार्च रोजी भावनगर जिल्ह्यातील सानोदर गावातील ५० वर्षीय अम्राभाई बोरीचा या दलित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. या कार्यकर्त्याचा जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला होता. जमाव मारहाण करत असताना एक पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होता पण त्याने या प्रसंगादरम्यान हस्तक्षेप केला नाही, असे मेवानी यांचे म्हणणे होते. त्यावर पोलिस आरोपींना केव्हा पकडणार असा मजकूर असलेला फलक मेवानी यांनी सभागृहात फडकवल्यानंतर गदारोळ सुरू झाला. मेवानी यांचा माईक बंद करण्यात आला. या प्रकरणात गृहमंत्री प्रतापसिंह जाडेजा यांनी निवेदन द्यावे अशी मागणीही मेवानी यांनी केली होती. त्यावर सभापती राजेंद्र त्रिवेदी यांनी सभागृहातील शिस्त पाळावी व आपल्या जागेवर बसावे असे मेवानी यांना सांगितले. कोणताही मुद्दा उपस्थित करायचा असेल तर सभापतीची परवानगी आवश्यक आहे, असेही त्रिवेदी आमदारांना सांगत होते. पण मेवानी आपल्या जागेवर बसत नसल्याने त्रिवेदी यांनी सार्जंटना सांगून मेवानी यांना सभागृहाबाहेर नेण्यास सांगितले व त्यांना एक दिवसासाठी निलंबित केले.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: