अहमदनगर रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे आदेश  

अहमदनगर रुग्णालयातील आगीच्या चौकशीचे आदेश  

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करून सखोल

माहितीआयुक्तांना माहितीचा अधिकार आहे का?
लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे!
झुंडशाहीला विरोधः मान्यवरांच्या पत्राची पीएमओला माहिती नाही

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करून सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

अहमदनगर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविडच्या रुग्णांना याची झळ बसली. या घटनेमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचाराधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दवी असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुर्घटना दिवसा घडली असल्याने त्याबद्दल चौकशीनंतर नेमकेपणाने वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घटनेत मृत्यु पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याने सत्य बाहेर येईल असे पालकमंत्री म्हणाले. या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल. ऱ्हदय पिळवटून टाकणारी अतिशय दुर्देवी घटना असल्याचे ते म्हणाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेतील सहा रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्यामुळे येथे आगीचा धूर मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला, या धुरामुळे गुदमरून ११ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे, त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या दुर्घटनेच्या बचावकार्यात अग्निशमन दलाच्या आणि सामान्य रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी, आणि नातेवाईकांनी अति तत्परतेने मदतकार्य सुरू करून येथील रुग्णांना बाहेर काढून दुसऱ्या जागी स्थलांतरित केले. तत्पूर्वी दुपारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून, तात्काळ मदत कार्यासाठी रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0