पलानीस्वामींकडे अण्णाद्रमुकचे नेतृत्व

पलानीस्वामींकडे अण्णाद्रमुकचे नेतृत्व

नवी दिल्लीः अण्णाद्रमुक पक्षावरच्या नियंत्रणावरच्या वादात इडापड्डी के. पलानीस्वामी यांचे पारडे सोमवारी जड दिसून आले. पलानीस्वामी यांना पक्षाच्या सर्वस

चेन्नईमधील पाणीसंकट व मान्सूनचे उशीरा आगमन
माणसाच्या आयुष्याचे सरकारला मोल नाही – उच्च न्यायालय संतप्त
तामिळनाडूत दलित युवकाची जमावाकडून हत्या

नवी दिल्लीः अण्णाद्रमुक पक्षावरच्या नियंत्रणावरच्या वादात इडापड्डी के. पलानीस्वामी यांचे पारडे सोमवारी जड दिसून आले. पलानीस्वामी यांना पक्षाच्या सर्वसाधारण सभेत पक्षाची धुरा सांभाळण्यास सांगितले. त्यानंतर पलानीस्वामी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्याकडील खजिनदारपदही काढून घेण्यात आले.

मद्रास उच्च न्यायालयाने पनीरसेल्वम यांची याचिका फेटाळल्यानंतर लगेच पलानीस्वामी यांनी अण्णाद्रमुक पक्षावर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या, त्यात पक्षाने पलानीस्वामी यांना पक्षाचे नेतृत्वपद दिले व पक्षातील दुहेरी नेतृत्वाचा प्रश्न निकालात काढला. २०१७ सालापासून पनीरसेल्वम व पलानीस्वामी यांच्यात संघर्ष सुरू होता.

२३ जून रोजी पक्षाच्या सर्वसाधारण सभेत ६६ आमदार पनीरसेल्वम यांच्यामागे उभे होते, त्यानंतर पक्षाचे नेतृत्व फक्त एकाच व्यक्तीकडे -पनीरसेल्वमकडे देण्याचे सदस्यांचे म्हणणे होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0