संसद समितीपुढे हजर राहण्यास अमेझॉनचा नकार

संसद समितीपुढे हजर राहण्यास अमेझॉनचा नकार

नवी दिल्लीः माहिती संरक्षण विधेयकासंदर्भात (डेटा प्रोटेक्शन बिल) संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर राहण्यास अमेझॉनने नकार दिला आहे. माहिती संरक्षण विधेय

अ‍ॅमेझॉनवर आलेले मानवनिर्मित संकट
उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज
पाँचजन्यची अॅमेझॉनवरही टीका; भ्रष्टाचाराचा आरोप

नवी दिल्लीः माहिती संरक्षण विधेयकासंदर्भात (डेटा प्रोटेक्शन बिल) संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर राहण्यास अमेझॉनने नकार दिला आहे. माहिती संरक्षण विधेयकासंदर्भात २८ ऑक्टोबरला संसदेच्या संयुक्त समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्ष भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी आहेत.

आता अमेझॉनचा एकही अधिकारी संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर न राहिल्यास तो हक्कभंग ठरेल व अमेझॉनच्या विरोधात कडक पावले उचलली जातील, असे लेखी म्हणाल्या. माहिती संरक्षण विधेयकाबाबत अमेझॉनवर कडक कारवाई करावी अशी सर्वच सदस्यांची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान शुक्रवारी फेसबुक इंडियाच्या धोरण प्रमुख आँखी दास या संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर राहिल्या आणि त्यांनी संसद सदस्यांच्या अवघड प्रश्नांना उत्तरे दिली असे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीत सदस्यांनी फेसबुककडून जमा केलेल्या माहितीबाबत प्रश्न विचारले. ग्राहकांची माहिती गोळा करून आपले व्यावसायिक हित फेसबुकने जपू नये, असे सांगण्यात आल्याचे समजते.

आता २८ ऑक्टोबरला ट्विटर व २९ ऑक्टोबरला गूगल व पेटीएम या दोन कंपन्यांना संसदेच्या संयुक्त समितीने बोलावले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0