अंबानींकडून ‘नेटवर्क-१८’ विक्रीची शक्यता

अंबानींकडून ‘नेटवर्क-१८’ विक्रीची शक्यता

देशातले एक बडे उद्योगपती व रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी त्यांच्या ताब्यातील ‘नेटवर्क-18 मीडिया अँड इन्व्हेसमेंट लिमिटेड’ या कंपनीला विकण

गरबा, दांडिया, विसर्जन मिरवणुकांना मनाई
महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक
देश दिवाळखोरीकडे – काँग्रेस

देशातले एक बडे उद्योगपती व रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी त्यांच्या ताब्यातील ‘नेटवर्क-18 मीडिया अँड इन्व्हेसमेंट लिमिटेड’ या कंपनीला विकण्याच्या मन:स्थितीत असून त्यांच्या या संदर्भातील प्राथमिक वाटाघाटी टाइम्स ग्रुपशी चालल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

अंबानी यांना ‘नेटवर्क-18 मीडिया’तून मोठ्या प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी या कंपनीला १ अब्ज ७८ लाख रु. तोटा सहन करावा लागला होता व कंपनीवर सुमारे २८ अब्ज रुपयांचे कर्ज आहे. या कर्जविळख्यातून सुटण्यासाठी रिलायन्सकडून कंपनीच्या स्थावर मालमत्ता, बाजारातील हिश्श्यांची विक्री व कंपनीचे हस्तांतरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

‘नेटवर्क-18 मीडिया’ संगीत, चित्रपट, मनोरंजन वाहिन्या अशा क्षेत्रात असून या कंपनीच्या ५६ वाहिन्या प्रसारित होता. त्याच बरोबर वृत्त देणाऱ्या मनी कंट्रोल, न्यूज-18, सीएनबीसीटीव्ही-18, क्रिकेटनेक्स्ट, व फर्स्टपोस्ट अशा कंपन्याही आहेत. या कंपन्या टाइम्स वृत्तसमूह चालवणाऱ्या बेनेट अँड कोलमन कंपनीला विकण्याचे हे प्रयत्न आहेत. ही कंपनी नेटवर्क-18 विकत घेण्याविषयी सल्ले संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून घेत आहे.

तर मनोरंजन क्षेत्रातील वाहिन्यांच्या विक्री वा हस्तांतराबाबत सोनीशी चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0