अमेरिकेत मतमोजणीस वेळ का?

अमेरिकेत मतमोजणीस वेळ का?

आतापर्यंत ‘ऍबसेंटी बॅलट्स’ कमी असायची. पण यावेळी कोव्हिड आणि मिलिशियाची भीती आणि गरीब वस्तीतील मतदान केंद्रे कमी झाली आहेत. म्हणून अभूतपूर्व प्रमाणात लोकांनी ‘ऍबसेंटी बॅलट्स’ टाकले आहेत. त्यांची मतमोजणी दोन तीन दिवस चालण्याची शक्यता आहे.

ब्राझील – ‘राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय’
जगात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
चीन कम्युनिस्ट पार्टीची शक्तिशाली यंत्रणांमध्ये ‘घुसखोरी’?

अमेरिकेत निवडणूक दुसऱ्या मंगळवारी निवडणूक असते. या वर्षी ३ नोव्हेंबर. प्रत्येक राज्याचे मतदान संपल्या संपल्या मतमोजणी चालू झाली. उदा. संध्याकाळी ९:०० पूर्वेकडे,  रात्री११.०० वा. पश्चिमेला. साधारणपणे पहाटे ३ (न्यू यॉर्क) / भारतात दुपारी १:३० पर्यंत निकाल लागला असतो. अख्खी अमेरिका जागी असते.

अमेरिकेत ‘ऍबसेंटी बॅलट्स’ (गैरहजर मतदान) किंवा ‘अरली व्होटिंग’ करता येते. ‘ऍबसेंटी बॅलट्स’ गव्हर्नमेंटकडून मिळवून मतदान पत्रिका भरता येते. पत्रिकेला दिलेला नंबर आणि तुमचे नाव डेटाबेसमध्ये असते. पाकीट सील करून बाहेर सही करायची असते. आपल्या मूळ सहीचे चित्र डेटाबेसमध्ये असते. मतमोजणीच्या वेळेस आधी बाहेरची सही तपासली जाते. मग पाकीट उघडून आतल्या मतपत्रिकेचा नंबर तुमच्या नंबरशी ताडून पाहिला जातो. मगच मतपत्रिका सपाट करून मशीनमध्ये टाकतात. पण स्वतः जाऊन (आधी किंवा मतदानाच्या दिवशी) मत टाकताना आधीच आयडी बघून मतपत्रिका दिलेली असते. ती सपाट असते. मतपत्रिका भरल्यावर मतदार ती डायरेक्टली मशीनमध्ये टाकतात. त्यामुळे मतदारांनी टाकलेल्या मतांची मोजणी लवकर होते. परंतु ‘ऍबसेंटी बॅलट’ला जास्त वेळ लागतो.

आतापर्यंत ‘ऍबसेंटी बॅलट्स’ कमी असायची. पण यावेळी कोव्हिड आणि मिलिशियाची भीती आणि गरीब वस्तीतील मतदान केंद्रे कमी झाली आहेत. म्हणून अभूतपूर्व प्रमाणात लोकांनी ‘ऍबसेंटी बॅलट्स’ टाकले आहेत. त्यांची मतमोजणी दोन तीन दिवस चालेल.

रिपब्लिकन मतदार कोव्हिड नाकारतात आणि ट्रम्पने आधीच सांगितले होते मतमोजणीला उशीर झाला तर तो कोर्टाकडून मतमोजणी थांबवणार. त्यामुळे जास्त करून रिपब्लिकन मतदारांनी स्वतः जाऊन मते टाकली होती.

आपल्याला माहीत आहे की अमेरिकेचा अध्यक्ष इलेक्टरल कॉलेज निवडतो. प्रत्येक राज्याला त्यांच्या काँग्रेसमधील (संसदेतील) जागांनुसार इलेक्टरल मते मिळतात. जिथे अटीतटीची लढाई असते त्या राज्यांना बॅटल ग्राऊंड राज्ये म्हणतात. यावेळी नेवाडा (लास व्हेगासचे राज्य), ऍरिझोना (ग्रँड कॅनियन असलेले राज्य), विस्कॉन्सिन, मिशिगन (डिट्रोइट असलेले राज्य), पेन्सिलव्हेनिया (फिलाडेल्फिया असलेले राज्य), जॉर्जिया (अटलांटा असलेले राज्य) ही बॅटल ग्राऊंड राज्ये आहेत.

‘ऍबसेंटी बॅलट्स’ कधी मोजायची याचे प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळे आहेत. उदा. मिशिगनमध्ये मतदान झाले की मोजली जातात. वर म्हटल्याप्रमाणे ही मते मोजायला वेळ लागतो. वरील बॅटल ग्राऊंड राज्यांची मतमोजणी अजून होत आहे. वरील राज्यांपैकी विस्कॉनसिन, मिशिगन, नेव्हडा, ऍरिझोना यात बायडन किंचित पुढे आहे. तिथे बायडन जिंकून त्यांची सर्व इलेक्टरल मते आणि मेन राज्याचे एक मत जिंकण्याची शक्यता खूप आहे. ते बहुसंख्य इलेक्टरल मते, २७० मिळून ते अमेरिकेचे अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत!

हे काल थोडेफार उघड होते. रिपब्लिकन मतदारांनी जास्त करून केंद्रात जाऊन मते दिले होती. त्यामुळे बहुसंख्य राज्यात रिपब्लिक पुढे होते. म्हणून ट्रम्प बुधवारी पहाटे २ वाजता आले आणि त्यांनी अचानक आणि कुठलाही आधार नसताना स्वतःचा विजय जाहीर केला. आणि

‘ऍबसेंटी बॅलट्स’ थांबवायची मागणी केली. कुठलेही पुरावा नसताना ती मते फ्रॉड आहेत असे आपल्या मनाप्रमाणे जाहीर केले. ते सुप्रीम कोर्टात पण जाणार आहेत. आता फ्रॉड नसताना कोर्ट मतमोजणी कसे थांबवणार हे अनाकलनीय आहे. कोर्ट लढे न्यायी झाले तर बायडन अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत!!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0