अमित मालवीय बंगालचे सहप्रभारी

अमित मालवीय बंगालचे सहप्रभारी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची राज्यातील पक्षाच

भाजपची ७५ लाख रोजगार कार्डची घोषणा मागे
‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानात करायची का ? – शहा
‘जय श्रीराम’ विरुद्ध ‘४२ एम’ व्हाया मिथुन!

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांची राज्यातील पक्षाचे कामकाज बघणारे को-मेंटॉर म्हणून नियुक्ती केली आहे. भाजप सोशल मीडियावर किती अवलंबून आहे हे मालवीय यांच्या नियुक्तीतून दिसून येते, असे मत अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मालवीय यांनी नियुक्तीनंतर लगेचच ट्विटरवरून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले. बंगाल हे भाजपसाठी महत्त्वाचे राज्य आहे आणि त्या राज्याचा सहप्रभारी होणे आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कोलकाता येथील राजशास्त्राचे अध्यापक प्रा. मैदुल इस्लाम म्हणाले, “अमित मालवीय यांच्या नियुक्तीची दोन कारणे आहेत. एक म्हणजे बंगाल हे मालवीय यांच्या परिचयाचे मैदान आहे. त्यांनी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांत भाजपला बंगालमध्ये चांगले यश मिळवून दिले आहे. दुसरे कारण म्हणजे २०२१ मधील निवडणुकांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवीय आणखी काही डिसइन्फर्मेशन कँपेन्स नक्की राबवतील.”

अमित मालवीय भाजपचे निर्वाचित प्रतिनिधी नाहीत किंवा तळागाळात काम करणारे कार्यकर्तेही नाहीत. सोशल मीडियाच्या आधारे चुकीची माहिती पसरवण्याच्या त्यांच्या हातखंड्यामुळेच त्यांची नियुक्ती झाली आहे, असे मत तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार सौगता रॉय म्हणाले. अर्थात भाजपला पक्षाच्या बंगालमधील नेतृत्वावर विश्वास नाही हेही यातून दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

बंगालमधील एका ज्येष्ठ भाजप नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘द वायर’ला सांगितले, “अमितजींनी आम्हाला २०१९ मध्ये अत्यंत गरजेची असलेली बढत मिळवून दिली आहे. त्यांची  नियुक्ती विचारपूर्वक करण्यात आली आहे आणि पक्षाच्या बंगालमधील सोशल मीडियावर आधारित उपक्रमांना यामुळे बळ येईल.”

मालवीय आणि चुकीची माहिती मालवीय गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून भाजपच्या आयटी विभागाच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार करत आहेत. त्यांतील तथ्ये चुकीची असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ऑल्ट न्यूजने त्यांच्या मिसइन्फर्मेशन कॅम्पेन्सची काही उदाहरणे दिली आहेत. शाहीन बागेत सीएएचा निषेध करणाऱ्या स्त्रियांना तसे करण्यासाठी पैसे देण्यात आले आहेत असा व्हिडिओ मालवीय यांनी प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या अन्वेषणात हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध झाले.

सोशल मीडियावरील युद्ध

सोशल मीडियाच्या वापरामध्ये भाजपने भारतात घेतलेली आघाडी वादातीत आहे. बंगालचाही याला अपवाद नाही. बंगालमधील सोशल मीडिया विभागात भाजपने मोठी गुंतवणूक केली आहे. ३९ वर्षांचे उज्ज्वल पारीक बंगालमधील भाजपच्या सोशल मीडिया सेलचे निमंत्रक आहेत. ते अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह ७०,०००हून अधिक व्हॉट्सअॅप ग्रुप्सचा ट्रॅक ठेवतात, असे समजते. काही लोकांनी जयश्रीराम म्हटल्यामुळे ममता बॅनर्जी संतप्त झाल्या असे दाखवणारा व्हिडिओ उज्ज्वल आणि त्यांच्या टीमनेच प्रसृत केला होता, असे बंगालमधील भाजप नेत्याने सांगितले. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वाधिक १८ जागा जिंकल्या होत्या.

आता तृणमूल काँग्रेसही आपले धोरण बदलून सोशल मीडियाचा उपयोग करून घेत आहे. ‘दिदी के बोलो’, ‘बांग्लार गोर्बो ममता’, ‘सेफ फ्रॉम बीजेपी’ असे अनेक उपक्रम पक्ष सोशल मीडियावर राबवत आहे. त्याला सोशल मीडिया यूजर्सचा तुफान प्रतिसादही मिळत आहे.

मूळ लेख:  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: