देशात २०२४ अखेर एनआरसी पूर्ण : अमित शहा

देशात २०२४ अखेर एनआरसी पूर्ण : अमित शहा

चक्रधरपूर : आगामी लोकसभा निवडणुकांपर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल, देशात घुसखोरी केलेल्यांची ओळख पटव

लवासा यांचे व्यक्तिगत हितसंबंध तपासण्याचे आदेश
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
दुसऱ्याच पुतळ्याला हार अर्पणः अमित शहांवर टीका

चक्रधरपूर : आगामी लोकसभा निवडणुकांपर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल, देशात घुसखोरी केलेल्यांची ओळख पटवली जाईल आणि अशा घुसखोरांना देशाबाहेर काढले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे निवडणूक प्रचारात सांगितले.

अमित शहा सध्या झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी येथे आले असून त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ‘राहुल गांधी घुसखोरांना देशाबाहेर काढू नका, ते कुठे जातील, ते काय खातील असे प्रश्न विचारत असतात. मी त्यांना सांगतो, अशा घुसखोरांना शोधून २०१४पर्यंत देशाबाहेर हाकलून दिले जाणार आहे व त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,’ असे शहा म्हणाले.

अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात दहशतवाद, नक्षलवाद, राममंदिर उभारणी हे सर्व मुद्दे राज्याच्या विकासाएवढेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी होऊ नये म्हणून प्रयत्न केले. पण आम्ही जनतेचे समर्थन पाहून हा विषय सर्वोच्च न्यायालयात धसास लावला व न्यायालयाने राममंदिर उभे करण्यास अखेर परवानगी दिली असे ते म्हणाले.

झारखंडमध्ये विकासाची गंगा वाहत असल्याचा दावाही शहा यांनी केला. गेल्या पाच वर्षांत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील रघुबर दास सरकारने राज्यातील नक्षलवादाचे उच्चाटन केले आणि राज्याला प्रगतीपथावर नेले. देवघर येथे एम्सची उभारणी झाली. आता बोकारो, धुमका, जमशेदपूर येथे लवकरच विमानतळ उभे केले जातील. या राज्याने पूर्वी राजकीय अस्थिरता अनेकदा अनुभवली आहे पण आता येथे राजकीय स्थिरता आली असून सुमारे २० लाख शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ झाल्याचा दावाही त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0