सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन

सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन

अमरावतीः २०२४च्या विधानसभा निवडणुकांत आम्हाला सत्ता दिल्यास ५० रु.दराने आपण दारु देऊ असे आश्वासन आंध्र प्रदेशमधील भाजपाने मतदारांना दिले आहे. मंगळवारी

महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक
मद्याच्या ऑनलाइन विक्रीस परवानगी घातक!
फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता

अमरावतीः २०२४च्या विधानसभा निवडणुकांत आम्हाला सत्ता दिल्यास ५० रु.दराने आपण दारु देऊ असे आश्वासन आंध्र प्रदेशमधील भाजपाने मतदारांना दिले आहे. मंगळवारी भाजपने घेतलेल्या सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष सोमू विराजू यांनी मतदारांना अनेक आश्वासने देताना दारूही ५० रु.त देऊ असे सांगितले.

आपल्या भाषणात विराजू यांनी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी व तेलुगू देसम पक्षावर जोरदार टीका केली. सत्ताधारी व विरोधी पक्ष राज्यात अपयशी ठरले असून खनिजाने समृद्ध असलेल्या या राज्यात कोणताही विकास घडला नाही, असा आरोप विराजू यांनी केला. ते म्हणाले, राज्यात १ कोटी लोक दारू पितात. या सर्वांनी भाजपला मते दिल्यास ७५ रु.ला दारू देऊ. जर यातून चांगला महसूल राज्याला मिळाल्यास ५० रु.चीही दारू देऊ.

विराजू यांनी असे वक्तव्य करून आंध्रात दारु महाग असल्याचे अप्रत्यक्ष सूचवले.

विराजू पुढे म्हणाले, सर्वसाधारणपणे एखादी व्यक्ती महिन्याला १२ हजार रु. दारुवर खर्च करते. ही रक्कम जगन मोहन रेड्डी गोळा करतात आणि ती योजनेच्या नावाखाली थेट बँकेत जमा करतात. सत्तेत आल्यानंतर आम्ही अमरावतीला राजधानी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू, हे राज्य ३ वर्षांत विकसित करू असेही विराजू म्हणाले.

विराजू यांनी आपल्या भाषणात कम्युनिस्ट ही भुंकणारी कुत्री असून त्यांनी देश उध्वस्त केला असाही आरोप केला.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: