रांचीः सत्तेत येऊन दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने झारखंडमधील सत्ताधारी हेमंत सोरेन सरकारने राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना येत्या २६ जानेवारीपासून प
रांचीः सत्तेत येऊन दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने झारखंडमधील सत्ताधारी हेमंत सोरेन सरकारने राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांना येत्या २६ जानेवारीपासून पेट्रोलवर दरमहा २५० रु.ची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम रेशन कार्डधारकांच्या बँक खात्यात थेट जमा होईल व याचा फायदा गरीब व मध्यमवर्गाला होईल असा दावा राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला.
आपला निर्णय जाहीर करताना सोरेन म्हणाले, पेट्रोल व डिझेलचे दर रोज वाढत असून त्याने गरीब व मध्यमवर्गाला मोठ्या प्रमाणात झळ पोहचत आहे. अनेक लोक पेट्रोल महाग झाल्याने आपल्या घरातील दुचाकीही बाहेर काढत नाहीत. शेतमाल विकायला बाजारात जाऊ शकत नाहीत. त्या मुळे अशा वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार रेशनकार्डधारक असलेल्या दुचाकीस्वाराच्या बँक खात्यात प्रतीलिटर २५ रु. जमा करेल व ही सबसिडी प्रती महिना १० लीटर पेट्रोलसाठी असेल, असे सोरेन म्हणाले. येत्या २६ जानेवारीपासून ही योजना चालू होईल अशीही त्यांनी घोषणा केली.
COMMENTS