आंध्रात आंबेडकरांच्या नावाला विरोध, जमावाने मंत्र्याचे घर पेटवले

आंध्रात आंबेडकरांच्या नावाला विरोध, जमावाने मंत्र्याचे घर पेटवले

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधील कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर अमलापुरम शहरात हिंसक प्रतिक्रिया उमटून र

सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन
विशाखापट्टणममध्ये विषारी वायूने ११ जणांचा मृत्यू
तेलंगण पोलिसांच्या ७ संशयित एन्काउंटर मोहिमा

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधील कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून बीआर आंबेडकर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर अमलापुरम शहरात हिंसक प्रतिक्रिया उमटून राज्याचे परिवहन मंत्री पिनिपे विश्वरुपु यांचे घर जमावाने जाळले. पोलिस विश्वरुपु व त्यांच्या कुटुंबियांना घरातून सुखरूप बाहेर काढले. जमावाने एक पोलिस वाहन व एक स्कूल बसलाही आग लावली. त्याच बरोबर जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. या दगडफेकीत २० पोलिस जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री तानेती वनिता यांनी काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व समाजकंटकांनी मंत्र्याच्या घराला आग लावल्याचा आरोप केला. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असाही इशारा वनिता यांनी दिला आहे.

गेल्या ४ एप्रिलला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा तयार करण्यात आला होता. या जिल्ह्याचे नामकरण बीआर आंबेडकर करण्यासंदर्भातील एक अधिसूचना सरकारने जाहीर करून लोकांच्या हरकतीही मागवण्यात आल्या होत्या. राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येत असताना जिल्ह्याचे नाव बदलू नये अशी मागणी कोनासीमा साधना समिती या बिगर राजकीय संघटनेकडून सुरू झाली. मंगळवारी या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नाव बदलू नये, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता. नंतर काही आंदोलक मंत्र्यांच्या घरासमोर आले. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न करताना जमाव हिंसक झाला व त्याचे मंत्र्याचे घर जमावाने पेटवून दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0