गुवाहाटी : १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांना दोनपेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना सरकारी सेवेत घेतले जाणार नाही, असा निर्णय आसाम सर
गुवाहाटी : १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्यांना दोनपेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना सरकारी सेवेत घेतले जाणार नाही, असा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. २०१७मध्ये आसाममध्ये लोकसंख्या व महिला सशक्तीकरण धोरण संमत झाले होते. त्या धोरणामध्ये दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी सेवेत घेतले जाऊ नये असा कायदा केला होता. या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी आसाम सरकारने हे पाऊल उचलले आहे.
गेल्या सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्या बैठकीत हा निर्णय लागू करण्याविषयी संमती झाली. या निर्णयाची झळ सध्या सरकारी सेवेत असणाऱ्या पण दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
मूळ बातमी
COMMENTS