आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचार; ६ पोलिस ठार

आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचार; ६ पोलिस ठार

आसाम-मिझोराम सीमेवरील वादग्रस्त भागावरून सोमवारी हिंसाचार झाल्याने त्यात आसाम पोलिस दलातील ६ पोलिस ठार झाले. हा हिंसाचार आसाममधील कछार जिल्ह्याची सीमा

‘सीएए’ला विरोधामुळे मोदींचा आसाम दौरा रद्द
आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
आसाम : दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही

आसाम-मिझोराम सीमेवरील वादग्रस्त भागावरून सोमवारी हिंसाचार झाल्याने त्यात आसाम पोलिस दलातील ६ पोलिस ठार झाले. हा हिंसाचार आसाममधील कछार जिल्ह्याची सीमा व मिझोराममधील कोलासिब जिल्ह्याची सीमा या भागात झाला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात सरकारी वाहनांचे नुकसान झाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी स्वतः ट्विट करून राज्याचे ६ पोलिस ठार झाल्याचे सांगितले.

दोनच दिवसांपूर्वी या दोन राज्यांतील सीमावादावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तरीही परिस्थिती अशांत असल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसून आले.

सीमेवर हिंसाचार झाल्याचे आसाम व मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितले. या दोघांनी अमित शहा यांना परिस्थितीत लक्ष घालावे अशीही विनंती केली.

एका व्हीडिओत मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी लोक कसे लाठ्या-काठ्या घेऊन हिंसा करत आहेत अशी तक्रार अमित शहा यांना ट्विटवर टॅग करून केली. हे त्वरित थांबले पाहिजे, असेही त्यांनी लिहिले आहे. मिझोराममधील एका निष्पाप दाम्पत्याला काही गुंडांनी मारहाण केली व तोडफोड सुरू केली, या हिंसक घटनांना न्यायोचित ठरवले जाणार का, असा सवालही शहा यांना उद्देशून जोरामथांगाजी यांनी केला आहे.

या ट्विटला उत्तर देताना हिमंत बिस्वा सरमा यांनी घटनेला कोलासिब जिल्हा पोलिस प्रमुखांच्या वर्तनाकडे निर्देश केले. आपणच परिस्थितीवर नियंत्रण आणावे, असा सल्ला त्यांनी दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0