गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहनविक्री ४.६१ टक्क्याने घसरली

गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहनविक्री ४.६१ टक्क्याने घसरली

नवी दिल्ली : गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील प्रवासी वाहनविक्री ४.६१ टक्क्याने घसरल्याची आकडेवारी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असो. (फाडा)ने प्रसिद्ध क

कोरोना व जगाचे बदलले जाणारे अर्थकारण : भाग १
‘२०२५ पर्यत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था अशक्य’
उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?

नवी दिल्ली : गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील प्रवासी वाहनविक्री ४.६१ टक्क्याने घसरल्याची आकडेवारी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असो. (फाडा)ने प्रसिद्ध केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पानंतरही वाहन बाजारावर सकारात्मक परिणाम झालेला दिसत नाही, असे ‘फाडा’चे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी सांगितले.

‘फाडा’ने देशातल्या १,४३२ आरटीओ कार्यालयांपैकी १,२२३ कार्यालयांकडून गेल्या वर्षभरातील वाहनविक्रींची माहिती मिळवली असून गेल्या वर्षी जानेवारीमध्ये देशात ३,०४,९२९ वाहनांची विक्री झाली होती. तो आकडा जानेवारी २०२० मध्ये घसरून २,९०,८७९ इतका झाल्याचे ‘फाडा’चे म्हणणे आहे.

दुचाकी वाहनांची विक्री ८.२२ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी १३,८९,९५१ दुचाकींची विक्री झाली होती. या वर्षी ही विक्री १२,६७,३६६ इतकी घसरली आहे. तर व्यावसायिक वाहनांची विक्री ६.८९ टक्क्याने घसरली असून गेल्या वर्षी ही विक्री ८८,२७१ इतकी होती ती यंदा ८२,१८७ इतकी घसरली आहे.

मंदीचा परिणाम तीनचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये मात्र दिसून आलेला नाही. गेल्या वर्षी ५८,१७८ तीनचाकी वाहने विक्रीस गेली होती यंदा ही विक्री ६३,५१४ इतकी म्हणजे ९.१७ टक्क्याने वाढलेली आहे.

वाहन बाजाराला लागलेल्या ग्रहणाला आर्थिक मंदी एक कारण असले तरी बीएस-सहा मानकामुळेही ग्राहकांची मागणी मंदावल्याचे काळे यांचे म्हणणे आहे. सरकारने वाहन बाजारासाठी सकारात्मक पावले उचलण्याची वेळ आली आहे आणि ती पावले लवकर उचलावीत अशी काळे यांनी सरकारला विनंती केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0