आर्यन खानसह तिघांना जामीन

आर्यन खानसह तिघांना जामीन

मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने आज क्रुझ ड्रग्ज प्रकरणात जामीन दिला.

देशद्रोह व दहशतवादाचे गुन्हेः पत्रकार कप्पनवर आरोपपत्र
पहलू खानवरील गो-तस्करीचा खटला हायकोर्टाकडून रद्द
मराठा आरक्षण रद्द

मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने आज क्रुझ ड्रग्ज प्रकरणात जामीन दिला.

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी ३ दिवस युक्तिवाद सुरू होता. आज संध्याकाळी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिघांना जमीन मंजूर केला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी निर्णय होणार असल्याने त्यानंतरच हे तिघे तुरुंगाबाहेर येतील.

माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खान याची बाजू न्यायालयात मांडली. ‘एनसीबी’च्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

मुकुल रोहतगी युक्तीवाद करताना म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होते असे मानले, तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडली इतकेच म्हणता येईल. ‘एनसीबी’ त्याला षडयंत्र म्हणत आहे. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची एकत्रीत बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटले जात आहे.” “क्रुझवर एकूण १३०० लोक असताना ‘एनसीबी’ने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचे सांगितले आहे. हा षडयंत्राचा आणि कटाचा भाग आहे. असे रोहतगी यांनी मांडले.

अनिल सिंग म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचे नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचे माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिल्या व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

याचसंदर्भात मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने २ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0