पहलू खानवरील गो-तस्करीचा खटला हायकोर्टाकडून रद्द

पहलू खानवरील गो-तस्करीचा खटला हायकोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : राजस्थानमधील अलवार येथे एप्रिल २०१७मध्ये गो-तस्करीच्या संशयावरून झुंडशाहीला बळी पडलेला पहलू खान, त्यांची दोन मुले व एका ट्रक चालकावर लावल

थरुर, सरदेसाईंसह अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल
आरटीपीसीआर चाचणी आता ३५० रु.त
दिल्ली दंगलीच्या याचिकांची सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली : राजस्थानमधील अलवार येथे एप्रिल २०१७मध्ये गो-तस्करीच्या संशयावरून झुंडशाहीला बळी पडलेला पहलू खान, त्यांची दोन मुले व एका ट्रक चालकावर लावलेली गो-तस्करीची फिर्याद राजस्थान उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली.

१ एप्रिल २०१७ रोजी पहलू खान आपल्या दोन मुलांसोबत काही गायी घेऊन जात असताना एका जमावाने त्यांना थांबवून गो-तस्करीचा संशय घेत जबर मारहाण केली होती. या मारहाणीत दोन दिवसांनंतर पहलू खान यांचा मृत्यू झाला होता. पण त्यावेळी पोलिसांनी पहलू खान, त्यांची दोन मुले इर्शाद व आरिफ व ट्रकचालक खान मोहम्मद यांच्यावर गो-तस्करीची फिर्याद दाखल केली होती.

गेल्या मे महिन्यात पोलिसांनी या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल केले होते पण पहलू खान यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नाव वगळले होते. पण या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. बुधवारी आपला निर्णय जाहीर करताना राजस्थान उच्च न्यायालयाने पहलू खान गाय खरेदी करण्यासाठी गेले होते पण त्यांचा हेतू गायींना मारण्याचा नव्हता असे स्पष्ट केले. पहलू खान यांचा व्यवसाय दुधविक्रीचा होता आणि त्यासाठी गायी खरेदी करण्यासाठी ते अलवारला आले होते. त्यांच्याकडे दुधविक्रीसाठी खरेदी केलेली कागदपत्रेही असताना त्यांच्याविरोधात गो-तस्करीचा गुन्हा दाखल करणे हा कायदाचा दुरुपयोग आहे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्यावर दाखल केलेली फिर्याद रद्द करत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

मूळ बातमी 

या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी हे वाचा – पहलू खान प्रकरण : पोलिसांचा असंवेदनशील तपास

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0