ममता बॅनर्जी यांचा विजय

ममता बॅनर्जी यांचा विजय

विजयी झाल्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “नंदीग्राममध्ये रचलेल्या षडयंत्राला भवानीपुरने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. त्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये ममता बॅनर्जी यांनी बाजी मारली.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर ”मी भवानीपुरच्या जनतेची ऋणी आहे,” अशी प्रतिक्रिया देऊन ममता बॅनर्जीं यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

यावर्षी मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत परभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणे आवश्यक होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्व आले होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.

विजयी झाल्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “नंदीग्राममध्ये रचलेल्या षडयंत्राला भवानीपुरने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भवानीपुरमध्ये जवळपास ४६ टक्के लोक बंगाली नाहीत. त्यांनी देखील मला मतदान केले आहे. केंद्र सरकारने आम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी षडयंत्र रचले होते. निवडणूक आयोगाने सहा महिन्यांच्या आतमध्ये निवडणूक घेतली आणि जनतेने मला मतदान केले. मी जनतेची आभारी आहे.”

COMMENTS