अविश्वास प्रस्ताव फेटाळला; पाकिस्तानात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका

अविश्वास प्रस्ताव फेटाळला; पाकिस्तानात पुन्हा सार्वत्रिक निवडणुका

नवी दिल्लीः पाकिस्तानच्या राजकारणात रविवारी अचानक मोठी उलथापालथ घडली. विरोधकांची इम्रान खान सरकारविरोधातल्या अविश्वासाची मागणी फेटाळत राष्ट्रपतींनी सं

मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा
पण लक्षात कोण घेतो?
है कली कली के लबपर…….

नवी दिल्लीः पाकिस्तानच्या राजकारणात रविवारी अचानक मोठी उलथापालथ घडली. विरोधकांची इम्रान खान सरकारविरोधातल्या अविश्वासाची मागणी फेटाळत राष्ट्रपतींनी संघ व प्रांतिक राज्यांमधील सरकारे रद्द करत ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील अशी घोषणा केली. राष्ट्रपतींचा हा निर्णय इम्रान खान सरकारला नामुष्कीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असून देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ताबडतोब दाद मागणार असल्याचेही विरोधी पक्षांनी जाहीर केले आहे.

विरोधकांचा अविश्वासाचा ठराव फेटाळल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी हा जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली व त्यांनी जनतेचे अभिनंदनही केले.

राष्ट्रपतींनी अविश्वासाचा ठराव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांनी आपले सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या जाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवला असता त्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले व निवडणुकांची घोषणा झाली.

रविवारी दुपारी नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी विरोधकांचा इम्रान खान सरकारविरोधातला अविश्वासाचा ठराव रद्द केला. विरोधकांनी आणलेला अविश्वासाचा ठराव हा घटनेतील ५ व्या कलमाचा भंग होता, त्यामुळे तो घटनाबाह्य होता असे उपसभापतींचे म्हणणे होते. प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला सत्तेशी इमान राखावे लागते व घटनेचे आणि कायद्याचे पालन करणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक असल्याचे उपसभापतींचे म्हणणे होते.

या घडामोडींनंतर  पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून टीव्हीवर भाषण केले व देशात ९० दिवसांत पुन्हा निवडणुका घेतल्या जातील असे जाहीर केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0