स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी

स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी

नवी दिल्लीः सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या कोरोनावरील लसीला आपातकालिन वापरासाठी शनिवार

कोविड-१९च्या ६.५ टक्के लसी खराब
४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्य
मोदींना उशीरा सुचलेले शहाणपण

नवी दिल्लीः सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या कोरोनावरील लसीला आपातकालिन वापरासाठी शनिवारी मंजुरी दिली आहे. ‘कोवॅक्सिन’ लस ही स्वदेशी असून भारत बायोटेक व आयसीएमआरच्या सहकार्याने ती विकसित केली जात आहे.

रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. व्ही. जी सोमानी पत्रकार परिषदेत सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकच्या लसींसंदर्भात माहिती देणार आहेत.

शुक्रवारी याच तज्ज्ञ समितीने अस्ट्राझेनेका व ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने विकसित केलेल्या ‘कोविडशील्ड’ या कोरोना विषाणूवरील लसीचा सार्वजनिक वापर करण्यास हरकत नसल्याचा शिफारस अहवाल दिला होता. त्यानंतरची दुसरी ही महत्त्वाची घटना आहे. कोविडशील्डचे उत्पादन भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून केले जाणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटला काही अटीशर्तींसहित आपातकालीन परिस्थितीत लस वापरण्यास मंजुरी द्यावी अशी तज्ज्ञ समितीने शिफारस केली होती. तशीच मंजुरी भारत बायोटेकला द्यावी असे तज्ज्ञ समितीचे म्हणणे आहे. भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याने व कोरोना विषाणूमध्ये बदल होत असल्याने ही लस आपातकालिन परिस्थितीमध्ये द्यावी असे तज्ज्ञ समितीचे मत आहे.

दरम्यान अहमदाबादस्थित झायडस कॅडिला हेल्थ केअर कंपनीच्या ‘झायकोव-डी’ या कोरोनावरील लसीच्या तिसर्या टप्प्यासाठीच्या वापराला सरकारने मंजुरी द्यावी अशीही शिफारस तज्ज्ञ समितीने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0