भीमा – कोरेगावचे ३४८ गुन्हे मागे

भीमा – कोरेगावचे ३४८ गुन्हे मागे

भीमा कोरेगाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगल प्रकरणातील ३४८ गुन्हे, तसेच मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत.

एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र
वरवरा राव यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश
अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार

भीमा कोरेगाव येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दंगल प्रकरणातील ३४८ गुन्हे, तसेच मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती विधानपरिषदेत दिली. या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल देशमुख विधानपरिषदेत बोलताना म्हणाले, की भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी सध्या ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. भीमा-कोरेगाव  प्रकरणातील उरलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. हे गुन्हे किरकोळ स्वरुपाचे आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचं करण्यात आलेलं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत, असेही देशमुख यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र विधान परिषदेत उत्तर देताना देशमुख यांननी नाणार आंदोलनातील केवळ तीनच गुन्हे मागे घेण्यात आल्याचे सांगितले. शेतकरी आंदोलनातील गुन्हेही मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी देशमुख यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावरून तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “आपल्याविरोधीतील बाजू असणाऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने शहरी नक्षलवादी संबोधले.” भीमा-कोरेगाव प्रकरणाची चुकीच्या दिशेने चौकशी झाली असेल तर पोलीस अॅक्ट किंवा एनआयए सेक्शन १०नुसार याप्रकरणाची महाराष्ट्र सरकार चौकशी करेल, असेही  त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0