एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र

एल्गार परिषदः ८ जणांवर एनआयएचे आरोपपत्र

मुंबईः एल्गार परिषद-भीमा कोरेगांव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी ८ जणांवर आपले आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांक

रोना विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करून कागदपत्रे घुसवली
भीमा-कोरेगांव प्रकरणात पुणे पोलिसांकडून हॅकिंगचे प्रयत्न
सुधा भारद्वाज यांना जामीन

मुंबईः एल्गार परिषद-भीमा कोरेगांव प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी ८ जणांवर आपले आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे सोपवल्यानंतरचे हे पहिलेच आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात विचारवंत आनंद तेलतुंबडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा, दिल्ली विद्यापीठातील प्रा. हनी बाबू, कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर व ज्योती जगताप, आदिवासी हक्क कार्यकर्ते फादरल स्टॅन स्वामी व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांची नावे आहेत.

या अगोदर पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे, रॉना विल्सन, अरुण फरेरा, वर्नन गोन्साल्विस, पी. वरवरा राव, शोमा सेन व सुधा भारद्वाज यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

फादर स्टेन यांना न्यायालयीन कोठडी

फादर स्टेन

फादर स्टेन

दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणात गुरुवारी झारखंडमध्ये अटक करण्यात आलेले ८३ वर्षांचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांना शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एल्गार परिषद प्रकरणी गुरुवारी एनआयएने रांची येथून फादर स्टेन स्वामी यांना अटक केली होती व शुक्रवारी त्यांना न्यायालयात सादर केले. एनआयएने त्यांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडी मागितली नाही. या अगोदर स्वामी यांची पुणे पोलिस व एनआयएने दोन वेळा एल्गार परिषद प्रकरणी चौकशी केली आहे. त्यांचा माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा एनआयएचा आरोप असून या संदर्भात अटक करण्यात आलेल्या त्या १६ व्या व्यक्ती आहेत.

मूळचे केरळचे असलेले फादर स्टेन स्वामी हे गेली पाच दशके झारखंडमध्ये आदिवासींच्या अधिकारांसाठी लढत आहेत. पोलिसांचा अत्याचार व आदिवासींचा हक्क याबद्दल ते सतत आवाज उठवत आले आहे. त्यांनी आदिवासी तरुणांच्या अटकांसंदर्भातही अनेक वेळेस प्रशासनाला प्रश्न विचारले होते. गुरुवारी एनआयएचे पथक स्वामी यांच्या रांची येथील घरी पोहचले व कोणतेही वॉरंट न दाखवताना त्यांनी स्वामी यांना मुंबईत आणले.

८३ वय असलेल्या स्वामींची प्रकृती खराब असून कोविड-१९च्या काळातही त्यांना झारखंडमधून मुंबईत आणले यावर टीका केली जात आहे.

एल्गार परिषद व माओवादी संघटनांशी आपला कसलाही संबंध नाही, असा दावा या पूर्वी स्वामी यांनी केला आहे. त्यांची या पूर्वी दोनदा चौकशी करण्यात आली होती. २८ ऑगस्ट २०१८ व १२ जून २०१९ मध्ये त्यांच्या घरावर छापे मारले होते. आता आपल्याला अटक होईल अशी शक्यता स्वामी यांनी पूर्वीच व्यक्त केली होती. त्यांनी या संदर्भातला एक व्हीडिओही चित्रित केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0