भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे

भीमा-कोरेगाव तपास एनआयएकडे

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास केंद्र सरकारने कोणतीही मागणी नसताना राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेकडे सोपवला आहे. महाराष्ट्रामध्

भीमा-कोरेगांव दंगल खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले
वैद्यकीय कारणांवरून वरवरा राव यांना कायमस्वरुपी जामीन
रोना विल्सन यांचा लॅपटॉप हॅक करून कागदपत्रे घुसवली

भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेच्या गुन्ह्याचा तपास केंद्र सरकारने कोणतीही मागणी नसताना राष्ट्रीय तपास (एनआयए) यंत्रणेकडे सोपवला आहे.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा आढावा घेण्यात येत होता. यासंदर्भात कालच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना बोलावून प्रकरणाची माहिती घेतली होती. तपासामध्ये खूप त्रुटी दिसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे याचा तपास पुन्हा गरज असल्याचे त्यांनी सुतोवाच केले होते. हे सुरु असतानाच, केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे.

हे प्रकरण एनआयकडे वर्ग होताच राज्यामध्ये सत्ताधारी नेत्यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. हा थेट राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार विद्या चव्हाण यांनीही टीका केली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार घाबरल्यामुळे एनआयकडे हा तपास सोपवण्यात आला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

एनआयए ही भाजपाची नाही तर स्वतंत्र संस्था असून, वास्तव बाहेर आले पाहिजे, प्रकाश आंबेडकर कशाला घाबरतात असे भाजपचे विनोद तावडे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0