नवी दिल्लीः या वर्षभरात भाजपने उ. प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४४.२७ कोटी रु. खर्च केले आहेत. य
नवी दिल्लीः या वर्षभरात भाजपने उ. प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ३४४.२७ कोटी रु. खर्च केले आहेत. या राज्यांत पाच वर्षांपूर्वी भाजपने २१८.२६ कोटी रु. खर्च केले होते. या खर्चाशी तुलना केली असता यंदा खर्चात ५८ टक्के वाढ झाली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आपल्या निवडणूक खर्चाच्या आकडेवारीतून ही माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
भाजपशिवाय काँग्रेसने यंदा ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत १९४.८० कोटी रु. खर्च केले आहेत. हा खर्च पाच वर्षांपूर्वी १०८.१४ कोटी रु. इतका होता. हा खर्च मागील खर्चापेक्षा ८० टक्के अधिक आहे.
भाजपचा सर्वाधिक खर्च उ. प्रदेशात २२१.३२ कोटी रु. इतका झाला असून २०१७मध्ये हा खर्च १७५.१० कोटी रु. इतका होता. हा खर्च मागील खर्चापेक्षा २६ टक्के अधिक आहे. यंदाच्या निवडणुकांत भाजपला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत.
पंजाबमध्ये भाजपने केलेला खर्च ३६.७० कोटी रु. असून २०१७मध्ये हा खर्च ७.४३ कोटी रु. होता. हा खर्च मागील खर्चापेक्षा ५ पट अधिक आहे. या निवडणुकांत भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे.
गोव्यात भाजपचा यंदाचा खर्च १९.०७ कोटी रु. इतका होता. २०१७मध्ये हा खर्च ४.३७ कोटी रु. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा ४ टक्के अधिक होता.
मणिपूर, उत्तराखंड मध्ये यंदा निवडणूक खर्च २३.५२ कोटी रु. (२०१७मध्ये ७.८६ कोटी रु.) व ४३.६७ कोटी रु. (२०१७मध्ये २३.४८ कोटी रु.) इतका झाला.
गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्यात भाजपने पुन्हा सत्ता राखली आहे.
या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस व भाजपने सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. भाजपकडून सोशल मीडियावर झालेला खर्च १२ कोटी रु. तर काँग्रेसचा खर्च १५.६७ कोटी रु. इतका आहे.
मूळ वृत्त
COMMENTS