सरसंघचालक भागवत ‘राष्ट्र पिता’ : मुस्लिम धर्मगुरूचे उद्गार

सरसंघचालक भागवत ‘राष्ट्र पिता’ : मुस्लिम धर्मगुरूचे उद्गार

नवी दिल्लीः मुस्लिम समाजाच्या भूमिका जाणून घेण्याच्या उद्देशाने गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत कस्तुरबा गांधी मार

लॉकडाऊनची धुळवड
पंजाबात भाजप ६५ जागा लढवणार
संभाषण खासगी व सुरक्षितः व्हॉट्सअपचा खुलासा

नवी दिल्लीः मुस्लिम समाजाच्या भूमिका जाणून घेण्याच्या उद्देशाने गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीत कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीला भेट दिली. त्यानंतर ते उत्तर दिल्लीतील तज्वीदूल कुरान मदरशातही गेले. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उमर अहमद इलायसी यांनी मोहन भागवत हे ‘राष्ट्र पिता’ असल्याचे उद्गार काढले. त्यावर भागवत यांनी तत्काळ या देशात एकच ‘राष्ट्र पिता’ असून आपण सर्व भारताची मुले (भारत की संतान) आहोत अशी दुरुस्ती केली, असे आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोहन भागवत यांची मुस्लिम समुदायाच्या एखाद्या प्रार्थना स्थळाला व जागेला ही पहिलीच भेट आहे. भागवत यांच्यासोबत आरएसएसचे काही पदाधिकारी होते. मुलांसमोर केलेल्या आपल्या भाषणात भागवत यांनी आपले धर्म वेगवेगळे व श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी सर्व धर्मांचा सन्मान राखला पाहिजे. या देशाला समजून घेतले पाहिजे, असे सांगितले.

भागवत व इलियासी यांनी अगोदर मशिदीत सुमारे तासभर चर्चा केली. या चर्चेत अनेक विषय आले. भारताला बलशाली करण्याचा मुद्दा आला असे इलियासी म्हणाले. देश पहिला आहे. आपला सर्वांचा डीएनए एक आहे. फक्त धर्म व श्रद्धास्थाने भिन्न आहेत, असे इलियासी म्हणाले.

भागवत यांच्या मुस्लिम धर्मगुरू व मशिदीला भेट देण्यासंदर्भात खुलासा करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील अम्बेकर म्हणाले, सरसंघचालक समाजातील सर्व प्रकारच्या लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. हा संवादाचा एक मार्ग आहे.

गेले काही दिवस भागवत मुस्लिम समाजातील काही व्यक्तींच्या गाठीभेटी घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, अलिगड विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीर उद्दिन शहा, माजी खासदार शाहीद सिद्दिकी व व्यावसायिक सईद शेरवानी यांची भेट घेतली होती.

या भेटीत भागवत यांनी मुस्लिमांकडून हिंदूंना सतत काफीर संबोधले जात असल्याकडे लक्ष वेधले. काफीरचा खरा अर्थ वेगळा असला तरी हे संबोधन हिंदूंसाठी अपमानास्पदरित्या वापरले जाते. याचा समाजात वेगळा संदेश जात असल्याचे भागवत यांनी सांगितले. त्यावर काही मुस्लिम विचारवंतांनी देशातील काही कट्टर उजव्या संघटना मुसलमानांना जिहादी व पाकिस्तानी असे संबोधतात याकडे लक्ष वेधले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0