अमित शहांच्या मतदारसंघात ‘कलम ३७०’ क्रिकेट स्पर्धा

अमित शहांच्या मतदारसंघात ‘कलम ३७०’ क्रिकेट स्पर्धा

नवी दिल्लीः भारतीय राज्य घटनेत जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा असणारे ३७० कलम हटवण्यात कळीची भूमिका बजावल्याबद्दल भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्र

एकाधिकारशाहीची संसदेत स्पष्ट झलक
सरकारी कारवाईने फुंकले शेतकरी आंदोलनात नवीन प्राण
‘एनपीआर’च्या नव्या मसुद्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब

नवी दिल्लीः भारतीय राज्य घटनेत जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा असणारे ३७० कलम हटवण्यात कळीची भूमिका बजावल्याबद्दल भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधी नगर लोकसभा मतदारसंघात ‘जीएलपीएल ३७०’ (गांधीनगर लोकसभा प्रिमियर लीग ३७०) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डिसेंबर महिन्याच्या मध्ये घेतली जाणार आहे.

अहमदाबाद शहरातील भाजप महासचिव जीतूभाई पटेल यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा घेतली जात आहे. राज्य घटनेतील कलम ३७०चे नाव क्रिकेट स्पर्धेला देण्यामागचे कारण अमित शहा यांनी हे कलम रद्द करण्यात मोठी कामगिरी केल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. अशा स्पर्धा आयोजित करून तरुणांना पक्षाकडे आकर्षून घेणे वा त्यांना भाजप समर्थक करणे हा एक उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रभारी हर्षद पटेल यांनी क्रिकेट व कबड्डीच्या माध्यमातून तरुणांना पक्षाकडे आकर्षून घेण्याचा आमचा उद्देश आहे. या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रत्येक वॉर्डातून दोन संघांना समाविष्ट केले जातील, असेल पटेल यांनी सांगितले.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघात वेजलपूर, घाटलोदिया, नारनपुरा, साबरमती, कलोल, गांधीनगर (उत्तर) व साणंद हे ७ विधान सभा मतदारसंघात आहेत.

अहमदाबाद व गांधीनगर लोकसभा मतदारसंघात १८०० बूथ असून क्रिकेट संघ, स्थान व समालोचकांची जबाबदारी भाजपने आपल्या पदाधिकार्यांकडे सोपवली आहे.

हे सर्व क्रिकेट सामने टेनिस बॉलवर होणार असून या स्पर्धेची माहिती पसरवण्यासाठी व्हॉट्स अप ग्रुप करण्यात आले आहेत.

२००७ पासून अमित शहा गुजरात क्रिकेट असो.शी निगडित आहेत. तर त्यांचा मुलगा जय शहा बीसीसीआयचे सचिव आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0