ब्रिटनमध्ये बोरिस पुन्हा सत्तेवर

ब्रिटनमध्ये बोरिस पुन्हा सत्तेवर

बोरिस जॉन्सन यांच्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ३६४ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी लेबर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. १२ डिसेंबरला ब्

बोरिस जॉन्सन यांच्या विजयाचा अर्थ काय?
खोटारडे पंतप्रधान
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

बोरिस जॉन्सन यांच्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ३६४ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी लेबर पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

१२ डिसेंबरला ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी १३ डिसेंबरला झाली. त्यामध्ये बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखाली लढलेल्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाने ६५० खासदार असलेल्या संसदेत ३६४ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँझर्व्हेटिव्ह पक्षाला मार्गारेट थॅचर यांच्यानंतर (१९८७) हे मोठे यश मिळाले आहे. ७४ जागांचे बहुमतापेक्षा अधिकचे संख्याबळ बोरिस यांच्याकडे आहे.

विरोधी लेबर पक्षाला २०३ जागा मिळाल्या आहेत. गेल्या ८४ वर्षातील लेबर पक्षाला या कमी जागा मिळाल्या आहेत.

सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याच नेतृत्त्वाखाली पक्षाने यश मिळविल्याने ते पुन्हा पंतप्रधान होतील. मात्र अनेक खासदारांनी त्यांना विरोध केला आहे.

काँझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाल्यावर ब्रिटन आता युरोपियन युनियनमधून लवकरच बाहेर पडू शकेल. ब्रेक्झीटच्या मुद्द्यावरच संसदेमध्ये पाठींबा न मिळाल्याने बोरिस यांनी निवडणुका घेण्याची शिफारस केली होती.

बोरिस जॉन्सन हे माजी परराष्ट्र सचिव आहेत.२००८ ते २०१६ या काळामध्ये ते लंडनचे महापौर होते.  ब्रेक्झिटविषयीची तत्कालीन पंतप्रधान थेरेसा मे यांची मते आणि धोरणे न पटल्याने बोरिस मे यांच्या कॅबिनेटमधून बाहेर पडले होते.

बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावं यासाठीच्या व्होट लिव्ह या मोहिमेचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळेच त्यांना मे यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोरिस यांचे अभिनंदन केले असू, आता ब्रेक्झीटचा मार्ग मिक्ला झाला असून, त्यापेक्षाही नवा मोठा करार आता करता येईल, असे त्यांनी ट्वीटरवर म्हंटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: