नागरिकत्व दुरुस्ती विधेयक – ईशान्येत भडका उडाला

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक – ईशान्येत भडका उडाला

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केल्यानंतर आज सकाळी राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली मात्र ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाला

२०१९मध्ये देशद्रोहाच्या ९३ प्रकरणांची नोंद
या कारणांमुळे ठरली बिहारची निवडणूक वैशिष्टयपूर्ण
अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केल्यानंतर आज सकाळी राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली मात्र ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाला जोरदार विरोध होत असून, आंदोलनाचा भडका उडाला आहे.

– आसामच्या काही भागामध्ये बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

– गुवाहाटीमध्ये विधेयकाला विरोध करण्यासाठी मोठे आंदोलन.

– ‘प्राग टीव्ही’च्या कार्यालयात आसाम पोलीस घुसले आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप. उलुबरी या ठिकाणी असलेल्या प्राग टीव्ही या खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यलयात काळा संध्याकाळी ६ वाजता पोलीस घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली असा आरोप व्यवस्थापकीय संचालक प्रणय बोर्डोलोई यांनी केला. ‘सीआरपीएफ’चे जवान आवारात आणि कार्यालयात आल्याचे फुटेज प्राग टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकौंटवरून प्रसारित केले आहे.

– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खाजगी टीव्ही वाहिन्यांना एक नोटीस पाठवली आहे. राष्ट्रद्रोही भावना प्रसारित होणार नाही, किंवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचेल, असे प्रसारण होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे नोटिशीत म्हंटले आहे. कायदा आणि सुव्यस्थेला धोका पोहोचेल, तसेच हिंसेला प्रवृत्त करणारे कोणतेही प्रसारण करू नये असेही नोटिशीत म्हंटले आहे.

– प्रतिदिन, प्राग, डीवाय ३६५, यांसारख्या काही स्थानिक वृत्तवाहिन्या काय प्रस्रीत करीत आहेत, यावर सरकारतर्फे लक्ष ठेवण्यात येत असल्याच वृत्त आहे.

– आसाम विद्यार्थी (आसू) संघटनेने १० तासांचे उपोषण जाहीर केले आहे.

– इंटरनेट, मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.

– सैन्याच्या ५ कंपन्या आसाममध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

– सैन्याने गुवाहाटी, दिब्रुगड, तीनसुखिया, जोरहाट या ठिकाणी संचलन केले.

– हिंसाचारात आत्तापर्यत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

– विधेयकातील कलम ६ प्रमाणे, आसामचे राजकीय, भाषिक, सांस्र्वकृतिक, जमिनीचे हक्क आब्धीत ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी आसामी आणि इंग्लिश मधून केले आहे. मात्र हे पाहण्यासाठी इंटरनेट बंद आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0