उ. प्रदेशात कोणत्याही पक्षाशी युती नाहीः मायावती

उ. प्रदेशात कोणत्याही पक्षाशी युती नाहीः मायावती

लखनौः आगामी उ. प्रदेश विधानसभा निवडणुकात बहुजन समाज पार्टी कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केले आहे. बसपाच बहुमताने सत्तेत येईल असा दावा त्यांनी लखनौत केला.

आमच्याकडे कोणत्याही पक्षाशी निवडणूक समझौता नाही. आम्ही आमच्या बळावर लढू. आम्ही राज्यातल्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांच्या हिताशी बांधिल आहोत, त्यांच्याशीच आमची कायमस्वरुपी युती असेल व ती राहील असे मायावती म्हणाल्या.

मायावती यांनी समाजवादी पार्टी व भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना ही निवडणूक हिंदू व मुस्लिम अशी लढवायची आहे, असा आरोप केला. २००७मध्ये आम्ही जसे संपूर्ण बहुमताने सत्तेत आलो तसे यावेळी येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसवर टीका करताना त्यांच्या आश्वासनाला उ. प्रदेशातील जनता भूलणार नाही, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनातील किमान ५० टक्के आश्वासने तरी पुरी केली असती तर तो पक्ष केंद्रात, उ. प्रदेशात वा अन्य राज्यात सत्तेवर दिसला असता, पण तसे चित्र आज दिसत नाही, असे मायावती म्हणाल्या.

COMMENTS