अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत

अदानी समूह एनडीटीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्लीः एनडीटीव्ही या वृत्तसमुहातील २९.१८ टक्के समभाग अदानी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (एएमएनएल) या कंपनीने विकत घेतल्याची माहिती मंगळवारी अदानी समु

नीता अंबानींना बीएचयूमध्ये विरोध
अदानी समूहाच्या मानहानीच्या दाव्यात पत्रकार रवी नायर यांच्याविरुद्ध वॉरंट
अडानी मानहानीः परंजॉय गुहा ठाकुरतांविरोधात अटक वॉरंट

नवी दिल्लीः एनडीटीव्ही या वृत्तसमुहातील २९.१८ टक्के समभाग अदानी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (एएमएनएल) या कंपनीने विकत घेतल्याची माहिती मंगळवारी अदानी समुहाने दिली. त्याच बरोबर एनडीटीव्हीतील अन्य २६ टक्के समभागही विकत घेण्याची आमची तयारी असल्याचे अदानी समुहाचे म्हणणे आहे. हा सर्व व्यवहार ४९३ कोटी रु.चा असल्याचे प्रसिद्ध पत्रक अदानी समुहाने प्रसारित केले आहे. पण या व्यवहारावर एनडीटीव्हीने तीव्र नापसंती व्यक्त करत आमच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क न साधता हे समभाग खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी अदानी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडचे सीईओ संजय पुगालिया यांनी एक पत्रक जारी केले असून या पत्रकात एएमएनएल कंपनीने एनडीटीव्ही या वृत्तसमुहातील विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (व्हीसीपीएल) ही कंपनी ११४ कोटी रु.ला खरेदी केल्याचे जाहीर केले. त्याच बरोबर एनडीटीव्ही समुहातील अन्य २६ टक्के हिस्साही आम्ही खरेदी करण्यास तयार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी झालेल्या खरेदी व्यवहारामुळे एएमएनएलच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा साध्य झाला असून नव्या पर्वाच्या सर्व माध्यमांमध्ये एक मार्ग मिळाला असल्याचे पुगालिया यांचे म्हणणे आहे. एएमएनएलला भारतीय नागरिकाचे सबलीकरण आवश्यक वाटते. त्याचबरोबर देशातील ग्राहक बाजारपेठ, माहिती व ज्ञान या मध्ये महत्त्वाची भमिका आमचा समुह बजावेल असा दावाही पुगालिया यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे. एनडीटीव्ही हा देशातील सर्वात महत्त्वाचा वृत्तसमुह असून या माध्यमात आमचा प्रवेश झाल्याने हा समूह अधिक बळकट होईल, असाही दावा पुगालिया यांनी केला आहे.

एनडीटीव्हीचा आरोप

दरम्यान अदानी वृत्तसमुहाने हा सर्व खरेदी व्यवहार आमच्याशी कोणताही संपर्क न साधता परस्पर केल्याचा आरोप एनडीटीव्हीने केला आहे. एऩडीटीव्हीने आपली तशी तक्रारही बीएसईकडे केली आहे.

अदानी समुह मीडियामध्ये

अदानी समुहाने बातम्यांच्या बाजारपेठेत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रवेश केला होता. त्या महिन्यात त्यांनी क्विंट डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संजय पुगालिया यांना अदानी मीडिया व्हेंचरचे सीईओ केले होते. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यात त्यांनी क्विंटलियन या कंपनीचे काही समभाग विकत घेतले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0