उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा

उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा शाखेला ही जबाबदारी घेण्यास सांगितले आहे आणि त्याची एक तुकडी आता अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्याबरोबर आहे. केंद्राने २०१३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती.

अडानी मानहानीः परंजॉय गुहा ठाकुरतांविरोधात अटक वॉरंट
‘अंबानी व संघाशी संबंधिताकडून ३०० कोटींची लाच’
‘अदानींची कोणती प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात होती?’

नवी दिल्ली : उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना केंद्र सरकारने ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे. आता त्यांना सीआरपीएफ कमांडोंचे सुरक्षा कवच असेल.

अधिकृत सूत्रांनी सांगितले, की अदानी समूहाचे अध्यक्ष अदानी यांना देशभरात प्रवासादरम्यान आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा दलांकडून सुरक्षा पुरवली जाईल.

देशभरात उपलब्ध असलेले हे सुरक्षा कवच ‘पेमेंट बेसिस’वर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यासाठी महिन्याला सुमारे १५-२० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी तयार केलेल्या अहवालाच्या आधारे ६० वर्षीय अदानी यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

सूत्रांनी सांगितले की केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा शाखेला ही जबाबदारी घेण्यास सांगितले आहे आणि त्यांचे पथक आता अदानींकडे आहे.

२०१३ मध्ये, केंद्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड प्लस श्रेणी सुरक्षा प्रदान केली होती. काही वर्षांनंतर त्यांची पत्नी नीता अंबानी यांना सुरक्षा कवच देण्यात आले. दोघेही सुरक्षेसाठी सीआरपीएफला दरमहा पैसे देतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0