आझादीचे नारे दिसल्यास देशद्रोहाचा गुन्हा – आदित्यनाथांची धमकी

आझादीचे नारे दिसल्यास देशद्रोहाचा गुन्हा – आदित्यनाथांची धमकी

कानपूर : भारताच्या भूमीवर विशेषत: उ. प्रदेशाच्या भूमीवर काश्मीरमध्ये जशा आझादीच्या घोषणा दिल्या जात होत्या, तशा ऐकायला मिळाल्यास आंदोलकांवर देशद्रोहाच

उ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलिस ठार
योगी सरकार : एक मंत्री गायब तर एका विरुद्ध वॉरंट
अलाहाबाद साथीच्या रोगांच्या उंबरठ्यावर!

कानपूर : भारताच्या भूमीवर विशेषत: उ. प्रदेशाच्या भूमीवर काश्मीरमध्ये जशा आझादीच्या घोषणा दिल्या जात होत्या, तशा ऐकायला मिळाल्यास आंदोलकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांना दिली आहे. या देशाच्या विरोधात कट कारस्थान रचणाऱ्यांना मोकाट सोडता येणार नाही, त्यांच्यावर देशद्रोहाखाली कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

कानपूर येथील साकेत येथील एका मैदानावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने एक जाहीर सभा आदित्यनाथ यांनी घेतली होती. या सभेत त्यांनी सीएए कायद्याच्या विरोधात धरणे धरणाऱ्या महिलांच्या नवऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, की काही जणांमध्ये आंदोलन करण्याची हिंमत नाही त्यामुळे ते आपल्या घरातल्या महिलांना व मुलांना चौकाचौकात धरणे धरण्यास भाग पाडत आहेत. पुरुष रजई घेऊन झोपले आहेत तर महिला चौकांचौकांत धरणे धरत आहेत.

आदित्यनाथ यांनी सीएएला विरोध करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पार्टी व डाव्यांवरही निशाणा साधत हे पक्ष केवळ राजकारण करण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधत असून त्यात आता महिलांना पुढे ढकलले जात असल्याचा आरोप केला.

लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलने करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे सांगत आदित्यनाथ यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दुकानांची जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांकडून सर्व पैसा वसूल केला जाईल पण त्या दंगेखोरांच्या पुढच्या पिढ्यांच्या लक्षात राहील अशी शिक्षा दंगेखोरांना दिली जाईल अशी धमकीही दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0