प्रसिद्ध गायक टीएम कृष्णा, सिद्धार्थसहित ६०० जणांवर गुन्हे

प्रसिद्ध गायक टीएम कृष्णा, सिद्धार्थसहित ६०० जणांवर गुन्हे

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणारे प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक टीएम कृष्णा, अभिनेता सिद्धार्थ, संसद सदस्य थिरुमावलवन

बंगालमध्ये भाजपच्या ५ रथयात्रा
शाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद
मोदी – शहा यांनी भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्राबाहेर का नेला?

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शने करणारे प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक टीएम कृष्णा, अभिनेता सिद्धार्थ, संसद सदस्य थिरुमावलवन यांच्यासहित ६०० जणांवर पोलिसांनी केस दाखल केली आहे. चेन्नई पोलिसांचे आदेश धुडकावून मोठ्या प्रमाणात नागरिक गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पोलिसांनी सुमारे ६०० जणांवर केस दाखल केली आहे.

दक्षिण भारतात गुरुवारी अनेक शहरात झालेल्या निदर्शनात हजारो नागरिक सामील झाले होते. कर्नाटकातील मंगळुरुमध्ये काही ठिकाणी हिंसाचार करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी  पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले होते.

कर्नाटक हायकोर्टाने सरकारला झापले

गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणारा विरोध पाहून राज्याच्या काही भागात व राजधानी बंगळुरुत १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान १४४ कलम लावण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाची वैधता उच्च न्यायालय तपासणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय ओका यांनी ,जर विविध भागांत निदर्शने होत असतील तर त्यावर सरकार बंदी घालणार का असा प्रश्न विचारला. जर राज्य सरकारने निदर्शनांस परवानगी दिली असेल तर नंतर त्याची परवानगी तुम्ही कशी रद्द करू शकता का, प्रत्येक निदर्शन हे हिंसक होईल असे राज्य सरकारला का वाटते, जर एखादा कलावंत, लेखक शांततापूर्ण आंदोलन करत असेल तर त्याला तोही करून द्यायचा नाही या पोलिसांच्या निर्णयावर तुम्ही सहमत आहात का असे अनेक प्रश्न न्या. ओका यांनी राज्यसरकारला विचारले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0