पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले

पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले

नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख बिपिन रावत व १३ अन्य जणांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू पायलटच्या चुकीने व खराब हवामानामुळे झाल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. गेल्या वर्षी ८ डिसेंबरला बिपीन रावत, त्यांची पत्नी व हवाई दलातील अन्य १२ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता व अन्य एका अधिकाऱ्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तिन्ही दलांनी समिती नेमली होती. या तिन्ही दलांच्या समितीने आपल्या अहवालात हवामानात अचानक झालेला बदल व हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळे दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष मांडला. खराब हवामानात हेलिकॉप्टर ढगांमध्ये फसले व त्यामुळे पायलटकडून चुका होऊन दुर्घटना घडली असे नमूद करण्यात आले आहे.

या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी हेलिकॉप्टरमधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपीट व्हाइस रेकॉर्डर यांचे विश्लेषण करण्यात आले.

COMMENTS