हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार

हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ ठार

नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्कर दलाचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूतील कोईम्बतूर

सीडीएस नियुक्तीचे निकष केंद्राने बदलले
पायलटची चूक व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले
रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्लीः देशाच्या तिन्ही लष्कर दलाचे प्रमुख बिपीन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे लष्करी हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूतील कोईम्बतूर ते सुलूर पट्ट्यात कोसळून त्यात १ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत व त्यांचा साहाय्यकारी कर्मचारी वर्ग होता. या दुर्घटनेत केवळ एक जण बचावले आहेत, त्यांचे नाव वरूण सिंग असे असून ते ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास करत होते.

भारतीय लष्कराने बुधवारी संध्याकाळी आपल्या ट्विटर हँडलवरून या दुर्घटनेचे वृत्त दिले आहे. हे हेलिकॉप्टर एमआय-17व्ही5 जातीचे होते. रशियाकडून १० वर्षांपूर्वी ते खरेदी करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर कोणत्याही हवामानाचा सामना करू शकते.

या अपघाताची चौकशी लष्कराने सुरू केली आहे. हा अपघात तांत्रिक कारणाने घडलाय की मानवी चूक त्याला कारणीभूत ठरली आहे, याची चौकशी लष्कराकडून केली जाणार आहे. हे हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपींसाठी वापरले जाते. त्याचा वापर पंतप्रधानही करत असतात.

मरण पावलेल्यांची नावे पुढील प्रमाणेः बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर (रावत यांचे संरक्षण साहाय्यक), लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग (रावत यांचे विशेष अधिकारी), नाईक गुरुसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लेफ्ट. नाईक विवेक कुमार, लेफ्ट. नाईक बी. साई तेजा व हवालदार सतपाल.

या एकूण दुर्घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी संसदेला माहिती देणार आहेत.

जनरल बिपिन रावत हे देशाच्या तिन्ही लष्करी दलाचे पहिले प्रमुख होते. त्यांनी १ जानेवारी २०२०मध्ये आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0