सरकार ओएनजीसीतील हिस्सा विकून ३ हजार कोटी कमावणार

सरकार ओएनजीसीतील हिस्सा विकून ३ हजार कोटी कमावणार

नवी दिल्लीः या आठवड्याच्या अखेर केंद्र सरकार ओएनजीसीमधील आपली १.५ टक्के हिस्सेदारी विकणार असून त्यातून सरकारला ३ हजार कोटी रु. मिळणार आहेत. मंगळवारी ओएनजीसीने शेअर बाजाराला ही माहिती दिली. सरकारची ओएनजीसीमध्ये समभाग विक्री ३० मार्चला सुरू होईल व ती ३१ मार्चला संपेल असे सांगण्यात आले.

सरकारचा ओएनजीसीमधील हिस्सा ६०.४१ टक्के इतका आहे व या कंपनीकडून देशातल्या एकूण तेल व नैसर्गिक वायूंच्या साठ्यांपैकी अर्ध्या अधिक साठ्यांतून उत्पादन केले जाते.

ओएनजीसीतील ९,४३,५२,०९४ समभाग विकण्याचा सरकारचा इरादा आहे. यासाठी प्रत्येक समभागाची किंमत दर्शनी मूल्य १५९ रु. ठेवले आहे. मंगळवारी हे मूल्य १७१.०५ रु. इतके होते.

मूळ वृत्त

COMMENTS