किंमती वाढल्याने भूतानकडून बटाटा आयात

किंमती वाढल्याने भूतानकडून बटाटा आयात

नवी दिल्लीः कांद्याच्या किंमती ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असताना बटाट्याच्या किमतीही वेगाने वाढत आहेत. देशभरात किमान ४५ रु. किलो दराने बटाट्याची वि

‘गोदी मीडिया’ची ‘हायपोडेर्मिक नीडल थेरपी’
एकनाथ शिंदे भूमिकेवर ठाम
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?

नवी दिल्लीः कांद्याच्या किंमती ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असताना बटाट्याच्या किमतीही वेगाने वाढत आहेत. देशभरात किमान ४५ रु. किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. बटाटा साठवणीची कमी शीतगृहे असल्याने त्यात कोरोना महासाथीमुळे बटाट्याच्या किंमती वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बटाटाच्या किमती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने सरकारने भूतानकडून बटाटा आयातीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. येत्या काही दिवसात भूतानकडून ३० हजार टन बटाटा भारतात येईल, अशी माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक मंत्री पियुष गोयल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे.

शुक्रवारी परदेशी व्यापार महामंडळाचे मुख्य संचालकांनी ३१ जानेवारी २०२१पर्यंत भूतानकडून कोणत्याही अडचणीशिवाय बटाटा आयात व्हावा यासाठीचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे जानेवारी अखेर सरकार भूतानकडून १० लाख टनापेक्षा अधिक बटाटा आयात करणार आहे.

देशातील बटाट्याची किंमती ऑक्टोबरनंतर वाढू लागल्याचे दिसून आले. ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत बटाटा ३९.३० रु. किलो इतका होता. हा दर १३० महिन्यातला सर्वोच्च होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा दर २०.५७ रु. किलो होता.

सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बटाट्याच्या किंमती अधिक असतात पण यंदा मार्च महिन्यापासून किंमती वाढू लागल्याचे दिसून आले. फेब्रुवारी व मार्चमध्ये बटाटा किलो मागे २३ रु. इतका होता.

अपुरी साठवणक्षमता

बटाटा साठवणीसाठी शीतगृहांची गरज असते. यंदा देशात २१४.२५ लाख टन बटाटा साठवण क्षमता आहे व यातून देशातल्या शीतगृहांमध्ये ५० किलोची ३६ कोटी पोती साठवता येऊ शकतात. यंदा लॉकडाऊनमुळे साठवणक्षमतेवर मर्यादा आल्या आहेत.

उ. प्रदेशातून देशाच्या मागणीचा २७ टक्के बटाटा पुरवला जातो. यंदा येथील पीक कमी आल्याने बटाट्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे १८-२२ रु. किलो असणारा बटाटा ६०-७० रु. किलो इतका वधारला आहे.

देशात कांद्याचा दरही किलोमागे ६५ रु. इतका झाला आहे. शिवाय पावसामुळे कांद्याचे उत्पादनावर परिणाम झाला असून तुर्की, इजिप्त व अफगाणिस्तानातून कांदा आयात केला जाणार आहे. सध्या या देशातून सुमारे ७ हजार टन कांद्याची आयात केली असून या दिवाळी अखेर अजून २५ हजार टन कांदा भारतात येणार आहे. पण या व्यवहारात सरकारचा थेट सहभाग कमी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0