मल्ल्या, मोदी, चोक्सीकडून १८ हजार कोटींची वसुली

मल्ल्या, मोदी, चोक्सीकडून १८ हजार कोटींची वसुली

नवी दिल्लीः हजारो कोटी रु.चा बँकांना गंडा घालून परदेशात पोबारा करणारे उद्योजक, व्यापारी विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याकडून संबंधित बँक

विराटचा गैरवापर केल्याचा मोदींचा दावा खोटा
एनआरसी लागू करण्याचा अद्याप निर्णय नाहीः सरकार
गतवैभवाच्या ‘उलट्या’ खुणा

नवी दिल्लीः हजारो कोटी रु.चा बँकांना गंडा घालून परदेशात पोबारा करणारे उद्योजक, व्यापारी विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याकडून संबंधित बँकांनी १८ हजार कोटी रु. वसूल केल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली असताना विजय मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याकडून बँकांनी १८ हजार कोटी रु. मिळवले असे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात ६७ हजार कोटी रु.चे मनी लाँडरिंगचे खटले पडून आहेत. ईडीकडून ४,७०० आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, गेल्या ५ वर्षांत आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाची संख्या वाढत आहे. २०१६-१७ ते २०२०-२१ या काळात आर्थिक गैरव्यवहारासंबंधित ३३ लाख फिर्यादी दाखल केल्या आहेत, पण २,०८६ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहितीही मेहता यांनी न्यायालयाला दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0